News Flash

मनसे नेत्याने राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याच्या डोक्यात घातला दगड, राज ठाकरेंना शिवीगाळ केल्याचा आरोप

अंबरनाथमध्ये हा प्रकार घडला आहे

मनसेच्या विधानसभा उमेदवाराने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. अंबरनाथमध्ये हा प्रकार घडला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिवीगाळ केल्याने आपण मारहाण केल्याची कबुली सुमेध भवार यांनी दिली आहे. सुमेध भवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपातून मनसेत प्रवेश केला होता. मतदारसंघ शिवसेनेला गेल्याने ते नाराज झाले होते.

सुमेध भवार यांनी मारहाण केल्याची कबुली देताना सचिन अहिरेकर यांनी राज ठाकरेंना शिवीगाळ केल्याने मारहाण केल्याचा दावा केला आहे. सुमेध भवार भाजपामधून विधानसभा लढण्यास इच्छुक होते. मात्र मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने ते नाराज झाले होते. यानंतर त्यांनी मनसेत प्रवेश केला होता. भाजपात असताना सचिन अहिरेकर स्वीय सहाय्यक म्हणून सुमेध भवार यांच्यासाठी काम करत होते. पण सुमेध भवार मनसेत केल्यानंतर त्यांनी काम बंद केलं होतं.

सचिन अहिरेकर यांनी सुमेध भवार यांनी त्यांच्या अंगरक्षकांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केला आहे. तसंच डोक्यात दगड घालण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. अहिरेकर सध्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अंबरनाथ विधानसभा अध्यक्ष आहेत. यामुळे मनसे विरुद्ध राष्ट्रवादी वाद रंगण्याची चिन्ह आहेत. पोलिसांनी सुमेध भवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2020 9:38 am

Web Title: mns sumedh bhavar raj thackeray ncp sachin ahirekar ambarnath sgy 87
Next Stories
1 वाहनविक्रीत घट
2 यूटीएस अ‍ॅप्लिकेशनने तिकीट काढताना प्रवाशांना अडचणी
3 महत्त्वाचे प्रकल्प राबवण्यात कडोंमपा अपयशी
Just Now!
X