ठाणे : ठाणे महापालिकेचे उपायुक्त डॉ. विश्वनाथ केळकर यांच्याविरोधात बुधवारी कापूरबावडी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. करोना रुग्णालयातील ३८ वर्षीय माजी कर्मचारी महिलेच्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ठाणे महापालिकेचे बाळकूम येथे ग्लोबल करोना रुग्णालय आहे. वर्षभरापूर्वी या रुग्णालयात पिडीत तरुणीची कंत्राटी पद्धतीने परिचारक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी  रुग्णालयात काम करत असताना केळकर यांनी विनयभंग केल्याची तक्रार पिडीत तरुणीने प्रशासनाकडे तसेच विशाखा समितीकडे केली होती. त्यानंतर कागदपत्रे अपूर्ण असल्याचे कारण देत पालिका प्रशासनाने तरुणीला कामावरून काढले  होते.