घातपात असल्याचा नातेवाईकांचा आरोप

विरार : नालासोपारा येथे एका महिला वसतीगृहात १७ वर्षीय मुलीने अचानक केलेल्या आत्महत्तेचे गूढ अजूनही कायम आहे.  मुलीबरोबर घातपात झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे.  नालासोपारा पोलिसांनी संचालक आणि मदतनीस यांच्यावर आत्महत्तेस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.

घटनेनंतर वस्तीगृहाकडून मुलीच्या मृत्यूची बातमी लपवल्याने मुलीच्या नातेवाईकांनी हत्या केलाच आरोप केला आहे. पण अध्यापही मुलीच्या मुत्युचे नेमके कारण न कळल्याने या प्रकरणाचे गूढ कायम आहे.

उमराळे  येथील शारदा शिशु निकेतनचे शोभा जोती केंद्राचे मुलींचे वसतिगृह आहे. यामध्ये सहा मुली राहत आहेत. वसतिगृहातचा राहणारम्य़ा एका १७ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीने गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास राहत असलेल्या रूमच्या बाल्कनीमधील खिडकीला ओढणीच्या साहयाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेची माहिती नालासोपारा पोलिसांना न देताच तिचा मृतदेह वसतिगृहाच्या संचालिका, अधीक्षक, केअर टेकर व इतर महिला स्टाफने खाली उतरवून तिच्या घरी घेऊन गेले. यांनतर तरुणीच्या नातेवाईक आणि वस्तीगृहाच्या महिला स्टाफने तिचा मृतदेह विजय नगर येथील वसई विरार महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेले. मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले होते.

सदर घटनेची माहिती नालासोपारा पोलिसांना मिळताच तिचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदन करण्यासाठी मुंबईच्या जेजे रुग्णालयात पाठवला आहे. तसेच अल्पवयीन तरुणीचा आत्महत्या केलेला मृतदेह पोलिसांना न सांगताच उतरवून तरुणीच्या घरी घेऊन जाणाऱ्या केअर टेकर, संचालिका पदमा पालित व दोन संचालकांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नालासोपारा पोलिसांनी दाखल केला आहे. तसेच मुलीच्या मृत्युप्रकरणी पोलिसांनी आत्महत्या केल्याची नोंद केली  आहे. पण अजूनही मुलीच्या मृत्यूचे नेमके कारण काय याची माहिती पोलिसांना रुग्णालयातून मिळाली नसल्याने या प्रकरणात तपास मंदावला आह. नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लबडे यांनी दिलेल्या माहितनुसार मुलीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने जेजे रुग्णालयातील डॉक्टरांनी मुलीचा व्हिसेरा ठेऊन घेतला असून, मृत्यूचे कारण राखीव ठेवले आहे. पण मुलीच्या अंगावर काही जखमा आहेत. त्या नेमक्या खाश्ने झल्या आहेत हे शव विच्चेदन अहवाल आल्यानंतर समोर येईल. आणि त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.  याबाबत वसतीगृहाच्या व्यवस्थापनास विचारले असता त्यांनी  बोलण्यास नकार दिला.