signalतुम्ही ठाण्यात राहा अथवा ठाण्यापल्याड, दर दिवशी कामानिमित्ताने मुंबईत येण्याची गरज जवळपास ७५ टक्के लोकांना पडतेच पडते. मात्र घरापासून रेल्वेस्थानकापर्यंत आल्यावर पाìकगसाठीची वणवण ठाणे आणि ठाण्यापल्याडच्या प्रवाशांसाठी नित्याची झाली आहे.
ठाणे, डोंबिवली, कल्याण या प्रमुख शहरांपासून ते थेट बदलापूर, आसनगाव, टिटवाळा, अंबरनाथ अशा छोटय़ा शहरांपर्यंत प्रत्येक शहरातील नागरिकांमधील महत्त्वाचा दुवा म्हणजे त्यांचा लोकलप्रवास! या शहरांमध्ये राहणाऱ्या तमाम लोकसंख्येपकी जवळपास ६० ते ७० टक्के लोक दर दिवशी मुंबईतील कोणत्या ना कोणत्या भागात नोकरीधंद्याच्या निमित्ताने येतात. लोकलच्या गर्दीतील कोंदट आणि जीवघेणा प्रवास करताना मेटाकुटीला आलेले हे प्रवासी मग किमान रेल्वेस्थानकापासून आपल्या घरापर्यंतचा प्रवास आरामात व्हावा, यासाठी मग दुचाकी वाहनांचा आसरा घेतात. परिणामी, ठाण्यापल्याडच्या दुचाकी वाहनांचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे.
दुचाकी वाहनांच्या वाढत्या संख्येकडे नजर टाकली, तर एकटय़ा ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात दर महिन्याला साधारण तीन ते साडेतीन हजारांपेक्षा जास्त दुचाकी वाहनांची नोंद होते. कल्याणच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात ही संख्या दोन ते अडीच हजारांच्या दरम्यान आहे. म्हणजेच वर्षभरात ठाण्यासारख्या शहरात तीस हजारांपेक्षा जास्त दुचाकी वाहने नव्याने रस्त्यावर येतात. दुचाकी वाहनांच्या या वाढत्या संख्येमागे नक्कीच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे अपयश हे प्रमुख कारण आहे.
पण या वाहनांच्या वाढत्या संख्येने नवीन डोकेदुखी तयार झाली आहे. ही आहे पाìकगसाठीची जागा! दर दिवशी रेल्वेस्थानकात येणाऱ्या हजारो दुचाकीस्वारांना त्यांची गाडी स्थानकाजवळ उभी करण्यासाठी जागाच उपलब्ध नाही. ही समस्या दिवसेंदिवस इतकी वाढत आहे की, अनेकदा घरापासून स्थानकापर्यंतचे अंतर दुचाकी वाहनाने लगेच कापले जाते. पण त्यानंतर ती वाहने उभी करण्यासाठी जागा शोधण्यात पंधरा ते वीस मिनिटे खर्ची पडतात.
रेल्वेने आपल्या जागेत काही पाìकगची व्यवस्था प्रत्येक स्थानकाबाहेर केली आहे. त्यासाठी वेगळे कंत्राटदारही नेमलेले आहेत. मात्र या कंत्राटदारांच्या अनोख्या तऱ्हांमुळे दुचाकीस्वारांना मनस्ताप सहन करावा लागतो. तसेच या पार्किंगसाठीच्या जागांमध्ये मर्यादित वाहने उभी राहू शकतात. ठाणे पूर्वेकडे असलेल्या पाìकग जागेत एकाच वेळी तब्बल साडेचारशे ते पाचशे गाडय़ा उभ्या राहतात. तर पश्चिमेकडील जागेत जेमतेम दोनशे ते तीनशे गाडय़ांची सोय होऊ शकते. डोंबिवली आणि कल्याण या स्थानकांबाहेरील पार्किंगबाबतही काही फार वेगळे चित्र नाही.
हे झाले स्थानकांबाहेरील पार्किंगचे चित्र! पण एकंदरीत शहरांतही हीच अवस्था आहे. पाìकगसाठी रस्त्यांच्या दोन्ही बाजूला असलेल्या जागेचा वापर सम-विषम तारखेच्या सूत्रानुसार केला जातो. नो-पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाडय़ा उचलण्यासाठीच्या व्यवस्थेबद्दलही अनेकांच्या तक्रारी आहेत. मात्र या सर्वाच्या मुळाशी पाìकगसाठीच्या जागेची टंचाई आहे. असे असतानाही महापालिकेकडे वाहनतळांबाबत काहीच ठोस योजना नाही. पुण्यासारख्या शहरांत गर्दीच्या ठिकाणी महापालिकेने वाहनतळ उभारले आहेत. मात्र ठाणे, डोंबिवली किंवा कल्याण या शहरांमध्ये असे वाहनतळ अभावानेच आढळतात. परिणामी, अनेकदा पाìकगसाठी छोटय़ा गल्ल्या, चिंचोळी जागा अशा ठिकाणांचा आधार घेतला जातो.
पाìकगसाठीची ही वणवण थांबवण्यासाठी पालिकेने वाहनतळ उभारण्याबरोबरच मोकळ्या जागांमध्ये पाìकगची जागा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. पण दीर्घकालीन आणि कायमस्वरूपी उपाययोजना करायची असल्यास दुचाकी वाहनांच्या संख्येला आळा घालण्याची गरज आहे. त्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि वेगवान करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करायला हव्यात.