15 August 2020

News Flash

मीरा-भाईंदरमध्ये करोनाचा वाढता फैलाव

उपायुक्तांचे नगरसेवकांना आवाहन

संग्रहित छायाचित्र

उपायुक्तांचे नगरसेवकांना आवाहन

वसई : मीरा-भाईंदर महापालिका हद्दीत करोनाच्या वाढत्या फैलावाला प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनाने दंड थोपटले असतानाच करोनाविरोधी मोहिमेला नागरिकांकडून अपेक्षित सहकार्य मिळावे यासाठी प्रशासनाने आता नगरसेवकांनाच आवाहन करून या मोहिमेला बळ मिळेल, या दृष्टीने नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन केले आहे.

करोना संशयितांचा शोध घेऊन त्यांची ताबडतोब तपासणी करणे,   करोनाबाधितच्या निकटच्या ंव्यक्तींची चाचणी करणे, त्याचाअहवाल येईपर्यंत त्यांना अलगीकरण कक्षात ठेवणे इत्यादी गोष्टींकरिता पालिका प्रशासनाने कंबर कसली असतानाच आता घरोघरी जाऊन  सर्वेक्षण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. नागरिकांमधील करोनाविषयक गैरसमज दूर करणे,    करोनाबाधित तथा त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना  अलीगकरण केंद्रात रवाना करणे, विभागात मोहल्ला क्लिनिक्स सुरू करण्यासाठी खासगी डॉक्टरांना जागा उपलब्ध करून देणे, इत्यादींसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन नगरसेवकांना   करण्यात आले आहे.

टाळेबंदी न करता पर्याय निवडण्याची सूचना

शहरात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने १० जुलैपर्यंत टाळेबंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर ही टाळेबंदी १८ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. टाळेबंदी करूनही रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे यापुढे टाळेबंदी न करता अन्य पर्याय निवडून वेगाने कामाला लागण्याची सूचना माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी पालिका प्रशासनाला केली आहे. १८ जुलैनंतर टाळेबंदीत वाढ करण्यात आली तर आपण स्वत: व्यापाऱ्यांसह उभे राहून आंदोलन करू., असे मेहता यांनी म्हटले आहे.

सर्वेक्षणाकरिता गेलेल्या कर्मचाऱ्यांना केवळ भीतीपोटी खरी माहिती देत नाहीत. त्यामुळे वेळेत निदान होत नाही. उपचाराअभावी रुग्ण अत्यवस्थ होतो. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढतेच, पण इतरांनाही करोनाची लागण होऊन रोगाचा प्रसार वाढतो. यावर नियंत्रण आणण्यासाठी आम्ही नगरसेवकांमार्फत लोकांमध्ये जनजागृती करणार आहोत.”

– संभाजी वाघमारे, उपायुक्त (वैद्यकीय), मीरा-भाईंदर महापालिका

प्रशासनाकडून आम्हाला लेखी सूचना आल्या आहेत. त्यानुसार प्रभागात करोनाबाबत जनजागृती करत आहोत.

– शर्मिला बगाजी-गंडोली, नगरसेविका, मीरा-भाईंदर महापालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 1:34 am

Web Title: rapidly spreading coronavirus in mira bhayandar zws 70
Next Stories
1 शिघ्र प्रतिजन चाचणीला सुरुवात
2 गृह अलगीकरणातील व्यक्तींना आधार
3 ठाणे जिल्ह्यात आणखी १,५०३ रुग्ण, ३५ मृत्यू
Just Now!
X