News Flash

दुर्मीळ श्वेत करकोच्याचे वसईत दर्शन

दरवर्षी थंडी पडू लागली की येथे मोठय़ा प्रमाणावर पाणपक्षी स्थलांतर करून येतात.

निर्सगाचे भरभरून वरदान लाभलेल्या वसई तालुक्यात मुबलक पक्षीवैभव लाभले आहे. मिठागरे, समुद्रकिनारा, भातशेती, पाणथळी जंगल अशी विविध पक्षी अधिवास ठिकाणे वसईत असल्याने देश-विदेशातील पक्षी स्थलांतर करून येथे आल्याचे पाहायला मिळते. दुर्मीळ म्हणून ओळखला जाणारा श्वेत करकोचा नुकताच वसईत आढळून आला आहे.

दरवर्षी थंडी पडू लागली की येथे मोठय़ा प्रमाणावर पाणपक्षी स्थलांतर करून येतात. या पक्ष्यांचे निरीक्षण, पक्षी प्रजातींची नोंद, त्यांचा अभ्यास करण्याचे काम ‘नेस्ट’ ही संस्था गेली अनेक वर्षे करीत आहे. ‘नेस्ट’ संस्थेचे सदस्य व पक्षिमित्र डॉ. अभय हुले व जॉनसन वर्की यांना वसई भागात पक्षिनिरीक्षण करताना सुमित अशा श्वेत करकोचाचे दर्शन घडले. वसईतील मिठागरांच्या भागात खाद्य शोधताना तीन श्वेत करकोचे या पक्षिमित्रांना दिसले. त्यांपैकी दोन प्रौढ व एक किशोरवयीन पक्षी असल्याचे डॉ. हुले यांच्या लक्षात आले. नेस्ट संस्थेचे पक्षिमित्र या पक्ष्यांचे निरीक्षण तसेच त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असतानाच आणखी चार श्वेत करकोचे त्यांच्यात सामील झाल्याने त्यांची संख्या सात वर पोहोचली आहे.

करकोचे आले कुठून?

  • श्वेत करकोचांचे मूळ स्थान युरोप असून तेथे त्यांची वीण होते.
  • हिवाळ्यात तेथे बर्फवृष्टी झाली की खाद्याचा तुटवडा भासू लागतो. मग हे करकोचे आफ्रिका खंड आणि भारतासारख्या उष्ण कटिबंधीय देशांकडे स्थलांतर करतात.
  • महाराष्ट्रात यापूर्वी मार्च २०१६मध्ये डोंबिवलीजवळील पडले गाव येथे श्वेत करकोचाचे दर्शन झाले होते.
  • २००८ मध्ये उरणला व २००९ ते २०११ मध्ये भांडुप येथे श्वेत करकोचा आढळला होता.

स्थानिक आदिवासी मांसासाठी या भागात येऊन बेचकीने पाणपक्ष्यांची शिकार करतात. परंतु ‘नेस्ट’च्या सदस्यांच्या वेळोवेळी समजावण्यामुळे आणि हटकण्यामुळे शिकारीचे प्रमाण कमी झाले आहे. वसईच्या मिठागरांमधील मिठाच्या उत्पादनात मोठय़ा प्रमाणात घट झाली आहे. मिठागरांचे कमी होणारे प्रमाण हे स्थानिक जैवविविधतेला धोक्यात आणणारे आहे. जैवविविधतेच्या दृष्टीने अतिशय महचत्त्वपूर्ण असलेला हा भाग ना-विकास क्षेत्र म्हणून घोषित करणे आवश्यक आहे.

सचिन मेन, पक्षी अभ्यासक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2016 1:18 am

Web Title: rare white stork
Next Stories
1 जैवविविधता उद्यानाचे भवितव्य अंधारात
2 जुन्या कापड बाजारात नोटाबंदीमुळे मंदी
3 रेल्वे स्थानकांच्या स्वच्छतेवर प्रवाशांचाच ‘झाडू’
Just Now!
X