कळवा येथील खारेगाव भागात एका ६८ वर्षीय महिलेला लुटल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

खारेगाव भागात वृद्ध महिला राहते. सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास त्या परिसरातून जात असताना दोन भामटय़ांनी त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या गळ्यातील ७६ हजार रुपयांच्या दोन सोनसाखळ्या चोरी केल्या. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.