कल्याण पूर्वेतील पालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक नवीन गवळी यांचा मंगळवारी रात्री उशिरा त्यांच्या समर्थकांनी चक्कीनाका येथे धूमधडाक्यात वाढदिवस साजरा केला. या कार्यक्रमात सहभागी एकाही कार्यकर्त्याने मुखपट्टी लावली नव्हती.

वाद्यांच्या कर्णकर्कश तालावर साजरा करण्यात आलेल्या या वाढदिवसाची ध्वनीचित्रफित  समाज माध्यमांवर फिरत आहे.  नवीन गवळी चक्कीनाका भागातील रहिवासी आणि गावदेवी-मेट्रो मॉल प्रभागाचे नगरसेवक आहेत.  पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन गवळी यांच्यासह मुखपट्टी न घातलेल्या १०० हून अधिक कार्यकत्र्यांवर दंडात्मक कारवाई करावी. किंवा हा सगळा दंड नवीन गवळी यांच्याकडून वसूल करण्याची मागणी होत आहे. गवळी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्या स्वीय साहाय्यकाने १५ मिनिटांत संपर्क करण्यास सांगतो असे सांगितले. त्यांनंतर त्यांनी संपर्क साधला नाही.