भाजपचे ज्येष्ठ नेते असलेल्या शेखर धुरी यांच्याकडे राजकारणापलीकडचा पैलू आहे तो म्हणजे साहित्याचा. अफाट वाचन, पुस्तकांवरील प्रेम आणि त्यासाठी जगभर केलेली भ्रमंती ही त्यांची खासियत. सध्या ते वसई कोमसाप शाखेचे कार्याध्यक्ष आहेत. पुस्तकांनी संस्कार दिले आणि ज्ञानाच्या अथांग सागरात पोहता आले असे ते सांगतात..

शाळेत असताना मला चांदोबा, पंचतंत्र इसापनीती असे बालसाहित्य वाचण्याची आवड होती. माझे वडील तेव्हा धनुर्धारी मासिकासाठी काम करायचे तसेच नवशक्ति दैनिकासाठी वार्ताहर म्हणून काम करत होते. त्यामुळे त्यांच्याकडे पुस्तकांचा संग्रह होता. या संग्रहातील पुस्तकांची हळूहळू ओळख होत गेली. पण वाचनाला खऱ्या अर्थाने गती मिळाली ती महाविद्यालयात. वर्तक महाविद्यालयात शिक्षण घेताना वाचनाची कक्षा रुंदावली. वर्तक महाविद्यालयाचे आणि माणिकपूरच्या समाजोन्नती मंडळाचे वाचनालय माझे सोबती बनले. मी झपाटल्यासारखा वाचू लागलो. नाथ माधव, ना. सी. फडके, वि. स. खांडेकर, पुल देशपांडे मी झपाटून वाचू लागलो. शालेय जीवनात मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात होतो. संघाच्या झोळी वाचनालयाने वाचनाचे महत्त्व अजून उमगले. वसई स्थानकासमोर मंजूनाथ नायक या पुस्तकप्रेमी हॉटेल व्यावसायिकाकडे अनेक लेखक यायचे. ते वडिलांचे मित्र होते. त्यांच्याकडे येणारे पुल देशपांडे यांच्यासहित अनेक लेखकांना लहानपणी दुरून पाहात असे. नायक कधी पुस्तके घेऊन जाण्यासाठी देत नसत. त्यामुळे मी त्यांच्याकडे जाऊन पुस्तकं वाचत असे.

Sham Kurle
बालसाहित्य शाम कुरळे बेपत्ता; कोल्हापुरात दिसल्याचे काहींचे दावे
kolhapur lok sabha seat, sanjay mandlik, sanjay mandlik controversial statement, shahu maharaj, historians criticise sanjay mandlik, shivsena, bjp, congress, lok sabha 2024, election 2024, mahayuti, maha vikas aghadi, kolhapur politics, kolhapur shahu maharaj, controversial statment on shahu maharaj,
छत्रपतींच्या गादीचा मंडलिकांकडून अवमान; इतिहास संशोधकांनी व्यक्त केला निषेध
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..
Why frequent allegations of political infiltration in Sahitya Akademi
विश्लेषण: साहित्य अकादमीत राजकीय घुसखोरीचा आरोप वारंवार का?

सावरकरांवरील इंतजार ए कालापानी हा सिनेमा पाहताना शिंडलर्स लिस्टवर सिनेमाची माहिती मिळाली. तेव्हा मी शिंडलर्स लिस्ट हे पुस्तक वाचले. मग नाझी नरसंहाराची मन हादरवून टाकणारी माहिती मिळाली. मी हेलावून गेलो. नाझींनी ज्यूंवरील केलेल्या अत्याचारांची एकापाठोपाठ एक पुस्तके वाचण्याचा सपाटा लावला. डायरी ऑफ अ‍ॅन फ्रँक, क्लाराज वॉर आदी पुस्तके आणि त्यानंतर याच विषयांवरील बॉय इन पायजमा, लाइफ इज ब्युटीफुल हे सिनेमे पाहिले. मी या पुस्तकांनी एवढा प्रभावित झालो की हॉलंडमधील अ‍ॅन फ्रँकचे घर आणि शिंडलर्स लिस्टचे घर, समाधी, छळछावण्या पाहून आलो. हजारो ज्यूंचे शिरकाण होत असताना जर्मन असणारा ऑस्कर शिंडलर्सने देवदूत बनून शेकडो ज्यू लोकांचे प्राण वाचवले. त्याबद्दल आदर निर्माण झाला. संघाचे प्रचारक ना. ह. पालकर यांनी लिहिलेलं ज्यूंवरील छळाकडून बळाकडे या पुस्तकांचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो.

वीणा गवाणकरांच्या एक होता काव्‍‌र्हर या पुस्तकाने एक निराळा आनंद दिला. आजही मी या पुस्तकाच्या प्रती लोकांना भेट देत असतो. अण्णा भाऊ  साठेंची सर्व पुस्तके मी वाचली आहेत. संघात असलो तरी संघातील वैचारिक किंवा प्रक्षोभक भाषणे देणाऱ्या पुस्तकांपासून मी दूर राहिलो. नुकतेच मी हद्दपार राजा थिंबा हे पुस्तक दोन दिवसांत संपवलं. सध्या मी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांचे चरैवती चरैवती हे आत्मचरित्र वाचतोय. यांनी घडवलं सहस्रक, लंडनच्या आजीबाई, प्रेषित, गार्गी अजून जिवंत आहे ही प्रभाव पाडणारी पुस्तकं आहेत.

फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे आवडते लेखक. त्यांच्यात महान साहित्यिक दडलेला आहे. त्यांचे ओअ‍ॅसिसच्या शोधात हे मला अप्रतिम पुस्तक वाटते. प्रवास वर्णन आणि त्यातून मानवी स्वभाव टिपण्याची त्यांची शैली अलौकिक अशी आहे. ग्रामपंचायत सरपंच झाल्यावर मी सर्वप्रथम डॉ. बळीराम हेडगेवार यांच्या नावाने वाचनालय सुरू केले.

सुदैवाने माझा वाचनाचा वेग प्रचंड आहे. प्रवासात असताना माझे चांगले वाचन होते. आजही मी पुस्तके घेऊनच प्रवास करतो. ट्रेनचा दीर्घपल्ल्यांचा प्रवास असला की पुस्तके सोबत असतात. माझ्यावर पुस्तकांचे संस्कार आहेत. मी राजकारणी असलो तरी आजही पुस्तके माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. पुस्तकांनी ज्ञानाबरोबरच संस्कारही दिले.

शब्दांकन – सुहास बिऱ्हाडे