29 January 2020

News Flash

बदलापूरमध्ये सेना नगरसेवकाच्या कार्यालयात तोडफोड

पक्षवाढीचे काम करत असल्याने राजकीय द्वेषातून कार्यालयावर हल्ला केल्याचा आरोप वडनेरे यांनी केला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

शिवसेना शहरप्रमुखावर गुन्हा दाखल

बदलापूर : बदलापूर पूर्वेतील दत्तवाडी येथील शिवसेना नगरसेवक शैलेश वडनेरे यांच्या कार्यालयावर बुधवारी काही शिवसैनिकांनी हल्ला केला. या प्रकरणी बदलापूर शिवसेनेचे शहरप्रमुख आणि नगरसेवक वामन म्हात्रे यांच्यासह नगरसेवक तुकाराम म्हात्रे आणि इतर आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवारी कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या सभेपूर्वी नगराध्यक्षांच्या कार्यालयात  वामन म्हात्रे आणि वडनेरे यांच्यात वाद झाला. नंतर वडनेरे मंडळात गणपतीच्या आरतीसाठी आले असताना त्यांच्या दत्तवाडी शाखेवर काही जणांनी हल्ला केला. या वेळी कार्यालयाच्या काचा आणि साहित्याची मोडतोड करण्यात आली. तसेच काही कार्यकर्त्यांनी रॉकेल टाकत कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही वडनेरे यांनी केला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून वामन म्हात्रे यांच्यासह तुकाराम म्हात्रे आणि इतर सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक देशमुख यांनी दिली आहे. यात केशव म्हात्रे, भावेश म्हात्रे, रोहिदास भंडारी, बंडू म्हात्रे, प्रसाद परब, बंटी म्हसकर आणि सात ते आठ जणांचा समावेश असल्याचेही देशमुख यांनी सांगितले आहे.

पक्षवाढीचे काम करत असल्याने राजकीय द्वेषातून कार्यालयावर हल्ला केल्याचा आरोप वडनेरे यांनी केला आहे. तर शैलेश वडनेरे पक्षविरोधी काम करत असल्याचा आरोप वामन म्हात्रे यांनी केला आहे.

First Published on September 12, 2019 3:52 am

Web Title: shiv sena corporator office vandalised in badlapur zws 70
Next Stories
1 हॉटेलमधील ग्राहकांच्या डेबिट कार्डची माहिती चोरणारे वेटर अटकेत
2 तक्रारदाराकडूनच आरोपीचा शोध
3 तीन महिन्यांत ६३२ झाडे भुईसपाट
Just Now!
X