महायुतीला संख्याबळापेक्षा ८९ मते जादा

राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते वसंत डावखरे यांना पराभवाची धूळ चारत ठाणे आणि पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेनेचे रवींद्र फाटक यांनी १५१ मतांनी दणदणीत विजय मिळवला. कोटय़वधी रुपयांच्या घोडेबाजाराचा आरोप आणि नगरसेवकांच्या राजकीय पर्यटनामुळे गाजलेल्या या निवडणुकीत पालकमंत्री एकनाथ िशदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मतांना सुरुंग लावत िशदे यांनी विजयाचे ‘डाव’खरे केले. फाटक यांना ६०१, तर डावखरे यांना ४५० मते मिळाली.

rohit pawar latest marathi news
रोहित पवारांना मुख्यमंत्री व्हायचं असल्याने ते अजित पवारांवर टीका करतात – सुनील शेळके
Kiran Mane post For Vasant More
अभिनेता किरण मानेची पोस्ट चर्चेत, “वसंत मोरेंना सलाम, पण मत रवींद्र धंगेकरांनाच, कारण..”
Sanjay Singh alleges that Arvind Kejriwal is not allowed to meet his family face to face
केजरीवाल यांचे नीतिधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न! कुटुंबीयांना समोरासमोर भेटू दिले जात नसल्याचा संजय सिंह यांचा आरोप
sharad pawar
धमक्यांना घाबरू नका, ‘त्यांना’ दुरुस्त करण्याची वेळ; शरद पवार यांचे अजित पवारांना थेट आव्हान

या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीकडे ५१२ मतांचे संख्याबळ होते. युतीच्या नेत्यांनी संख्याबळापेक्षा तब्बल ८९ मते अधिक मिळविल्याचे स्पष्ट झाले आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्य़ात एकूण १०६० मतदारांपैकी १०५७ मतदारांनी या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान केले होते.  सहा मते बाद झाली. या बाद मतपत्रिकांपैकी काहींवर डावखरे यांच्या नावासमोर चक्क फुल्या मारल्याचे आढळून आल्याची चर्चाही रंगली होती.

वसई-विरारमधील हितेंद्र ठाकूर यांची मदत मिळत नाही हे लक्षात येताच शिवसेना नेत्यांनी ठाणे, नवी मुंबई, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर अशा भागांत लक्ष केंद्रित केले होते. युतीच्या नगरसेवकांना खबरदारी म्हणून गोवा, महाबळेश्वर, अलिबाग येथे पाठविण्यात आले होते. भाजपमधील ‘राष्ट्रवादी’ नेत्यांच्या मदतीची रसद डावखरेंपर्यंत पोहोचणार नाही याची पुरेपूर दक्षता शिवसेना नेत्यांनी या निवडणुकीत घेतली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका बैठकीसाठी पाचारण करत त्यांच्याकरवी स्थानिक नेत्यांना योग्य ती ‘समज’ही देण्यात आली होती. या निवडणुकीत शिवसेनेने आघाडीची जवळपास १०० हून अधिक मते फोडल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांचा बालेकिल्ला असणाऱ्या नवी मुंबईतही आघाडीची मते वळविल्याचा दावा शिवसेनेचे नेते करत आहेत. विशेष म्हणजे, विजयासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मतांवर अवलंबून असणाऱ्या डावखरे यांचे निवडणूक प्रतिनिधी मात्र बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक होते. त्यावरून आघाडीतील विसंवादाची चर्चा रंगली होती.

फाटक यांच्या विजयाने पुन्हा एकदा ठाणे जिल्हय़ावर भगवा डौलाने फडकला असून महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या कष्टाचे यश आहे. तसेच महायुती भक्कम करणारा हा विजय आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या नेतृत्वाचा हा विजय आहे.

एकनाथ शिंदे, पालकमंत्री