इतर कर्मचाऱ्यांचे अहवाल नकारात्मक

वसई : वसई-विरार महापालिकेचे सर डी.एम. पेटिट रुग्णालय पुन्हा सुरू केले जाणार आहे. रुग्णालयातील इतर सर्व डॉक्टर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे करोना चाचणीचे अहवाल नकारात्मक आल्यानंतर पालिकेने हा निर्णयम् घेतला आहे. सध्या पालिकेने बा रुग्ण विभाग तीन पाळ्यांमध्ये सुरू केला आहे. या रुग्णालयतील ६ कर्मचाऱ्यांचा करोना चाचणी अहवाल सकारात्मक आल्याने पालिकेने हे रुग्णालय बंद केले होते.

वसई-विरार महापालिकेचे वसई गावातील सर डी. एम. पेटिट रुग्णालय हे सर्वात जुने रुग्णालय आहे. या रुग्णालयात २० डॉक्म्टरासंह १६९ वैद्यकीय कर्मचारी आहेत.  या रुग्णालयातील दोन परिचारिका एका करोनाग्रस्त रुग्णाला तपासायला गेल्या असता त्या दोघींना करोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर पालिकेने या दोन परिचारिकांच्या संपर्कातील काही जणांची चाचणी केली असता एक वॉर्डबॉय आणि तीन परिचारिकांना लागण झाल्याचे उघड झाले. या रुग्णालयातील एकूण ६ वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा करोना चाचणी अहवाल सकारात्मक आल्याने खळबळ उडाली आणि पालिकेने खरबदारी म्हणून रुग्णालय प्रतिबंधित करून नागरिकांसाठी बंद केले. या रुग्णालयातील दाखल असलेले रुग्ण अन्य आरोग्य केंद्रात हलविण्यात आले होते. पण दैनंदिन तपासणीसाठी येणारे बा रु ग्ण विभागातील (ओपीडी) रुग्णांची गैरसोय होऊ लागली होती. शहरातील खासगी दवाखाने बंद असल्याने जायचे कुठे असा प्रश्न या रुग्णांना पडला होता. प्रसूतीसाठी नाव नोंदविलेल्या गर्भवती महिलांपुढेही मोठे संकट आले होते.

कर्मचाऱ्यांचा करोनाबाधित अहवालानंतर त्यांच्या संपर्कातील सर्वच्या सर्व १६८ कर्मचाऱ्यांची चाचणी घेण्यात आली.  त्या वेळी सर्वाचे अहवाल नकारात्मक आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे पालिकेने आता या कर्मचाऱ्यांना घेऊन पुन्हा रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

कर्मचारी आणि डॉक्टर्स यांचे अहवाल नकारात्मक  असले तरी त्यांना काही दिवस घरी थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यानंतर रुग्णालय पूर्ण वेळ सुरू करण्यात येईल, असे महापौर प्रवीण शेट्टी यांनी सांगितले. सध्या मंगळवारपासून पालिकेने या रुग्णालयातील बा रुग्ण विभाग सुरू केला आहे. हा विभाग तीन पाळ्यांमध्ये सुरू आहे.

पुरेशा खबरदारीनंतरही रुग्णालयातील दोन परिचारिकांना लागण झाली हे दुर्दैवी होते. मात्र आता ६ जण वगळता इतर सर्वाचे अहवाल नकारात्मक आले ही मोठी दिलासादायक बाब असल्याचे ते म्हणाले. या सर्व कर्मचाऱ्यांना पीपीई किट देऊन रुग्णालय सुरू केले.