News Flash

पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

मुंबईतील गोराई पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होता.

(संग्रहित छायाचित्र)

 

शहापूर : येथील किन्हवली भागात मुंबई पोलीस दलातील पोलीस शिपाई भरत खापरे (३३) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला आहे. या प्रकरणाची नोंद किन्हवली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, आजारपणामुळे त्याने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविला जात आहे.

किन्हवली येथील अल्याणी भागात भरत खापरे राहत होता. तो मुंबईतील गोराई पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होता. गेल्या चार-पाच दिवसांपासून त्याची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे तो घरीच होता. सोमवारी सकाळी ग्रामस्थांना भरत खापरे याचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह त्याच्या घराबाहेर आढळून आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2021 12:07 am

Web Title: suicide of a police employee akp 94
Next Stories
1 ठाण्यात दहा दिवसांत दोन प्राणवायू प्रकल्प
2 चाचण्यांतही घट
3 कोपर पुलाच्या कामासाठी वाहतूक बदल
Just Now!
X