जिल्ह्य़ाचा कारभार धोकादायक इमारतींमधून; प्रशासनाचे दुर्लक्ष

नोंदणीकृत संस्था आणि सोसायटय़ांच्या कारभारावर देखरेख करणारा ठाणे जिल्ह्य़ातील लेखा विभागही गेल्या आठ वर्षांपासून धोकादायक इमारतीत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

शहरातील धोकादायक इमारती तातडीने खाली करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाने दिले आहेत. मात्र पर्यायी जागा मिळू न शकल्याने अनेक रहिवासी अद्याप धोकादायक इमारतीतच राहत आहेत. शासनाच्या लेखा विभागाचीही तीच अडचण आहे. दुसरी व्यवस्था न होऊ शकल्याने जिल्हा विशेष लेखाधिकारी  वर्ग-१ चे कार्यालयही जेमतेम उभ्या असलेल्या एका कुतुममिनारसदृश सहकार भवनात कार्यरत आहे. शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळच एका गल्लीत सहकार भवन नावाची तब्बल नव्वद वर्षांपूर्वीची इमारत आहे. या इमारतीतील इतरांनी अन्यत्र स्थलांतरही केले आहे. पूर्वी या ठिकाणी ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन एम्प्लॉइज को-ऑप. क्रेडिट सोसाठाणे लेखापरीक्षण विभागाची सत्त्वपरीक्षा    यटीचे कार्यालय होते. दर्शनी भागातील फलकावरील उल्लेखानुसार ही इमारत १९२४ची आहे. आता इमारतीचे खांब, सज्जे निखळू लागले आहेत. अनेक ठिकाणी प्लास्टर निखळून छत उघडे पडले आहे. पावसाचे पाणी थेट इमारतीत घुसून भिंतींवर शेवाळे माजले आहे. मात्र तरीही नाइलाज असल्याने इमारतीच्या पहिल्या मजल्यावर लेखा विभागाचे कर्मचारी जीव मुठीत धरून काम करीत आहेत. ठाणे जिल्ह्य़ातील तब्बल ३१ हजार ८०३ नोंदणीकृत संस्था आणि सोसायटय़ांचे लेखा परीक्षण या कार्यालयामार्फत होते. पहिल्या मजल्यावरील एका सभागृहसदृश जागेत लेखा परीक्षण खात्याचा कारभार चालतो. मागच्या बाजूला असलेल्या एका वळणदार जिन्याने येथे जाता येते. कार्यालयात ३३ कर्मचारी आहेत. याशिवाय लेखा परीक्षणाच्या कामानिमित्त ठाणे जिल्ह्य़ाच्या विविध भागांमधून दररोज शेकडो नागरिक येथे येत असतात. इमारत कोसळली तर जीवितहानीबरोबरच महत्त्वाची कागदपत्रेही नष्ट होण्याची भीती येथे कामानिमित्त येणारे नागरिक व्यक्त करीत आहेत.

विष्णूनगरमध्येही तीच परिस्थिती

नौपाडय़ातील विष्णूनगरमध्ये जिल्हा लेखा विभागाची एक शाखा कार्यान्वित असून ती इमारतही अतिशय धोकादायक आहे. या ठिकाणी १४ कर्मचारी आहेत. येथील कर्मचारीसुद्धा अक्षरश: जीव मुठीत धरून कसेबसे आठ तास काढतात.दोन्ही ठिकाणी हीच बोंब आहे.

इमारत धोकादायक झाल्यापासून आम्ही जागेच्या शोधात आहोत. बराच पाठपुरावा केल्यानंतर गेल्या वर्षी जिल्हाधिकारी कार्यालयालगत असलेल्या नियोजन भवनात आम्हाला चौथ्या मजल्यावर जागा देण्यात आली होती. त्यानुसार पावसाळ्यापूर्वी आम्ही त्यात स्थलांतरित होणार होतो. मात्र पुन्हा ती जागा आम्हाला देण्यात येत नसल्याचे कळविण्यात आले. त्यामुळे आता पुन्हा नव्याने जागेचा शोध सुरू आहे.

-सावळाराम पुजारी, जिल्हा विशेष लेखा परीक्षक-वर्ग- १