ठाणे स्थानकाबाहेर बैलगाडी उभी असलेले १९ व्या शतकातील छायाचित्र बऱ्याच लोकांना माहिती आहे. संबंधित छायाचित्र त्यापेक्षा किती तरी अलीकडचे म्हणजे १९५० च्या सुमाराचे आहे. ठाणे हे तेव्हा एक छोटेसे गाव होते. काही मूठभर लब्धप्रतिष्ठितांकडे चार चाकी वाहने होती. ती वाहने अगदी आरामात स्थानकासमोर पार्क करून ठेवली जात असल्याचे या छायाचित्रात दिसत आहे. आता वाहन पार्किंग ही शहरातील एक प्रमुख समस्या आहे. स्थानकाबाहेरील वाहतुकीच्या नियोजनासाठी सॅटिस प्रकल्प साकारण्यात आला आहे. या पाश्र्वभूमीवर ५० च्या दशकातील हे चित्र खूपच सुखावह वाटते.

(जुने छायाचित्र-सदाशिव टेटविलकर यांच्या संग्रहातून, नवे छायाचित्र-दीपक जोशी)