सिंधुदुर्ग येथे पार पडलेल्या ट्रायअॅथलॉन व अॅक्व्अॅथलॉन राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये ठाणे जिल्ह्य़ाने चांगली कामगिरी केली असून या स्पर्धेत जिल्ह्य़ाने दुसरे स्थान प्राप्त करत उप-विजेतेपद पटकावले आहे. तसेच, अनेक खेळाडूंनी उत्कृष्ट वैयक्तिक कामगिरी करत पदके मिळवली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात ५ व ६ डिसेंबरला झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यातील प्रत्येक जिल्ह्य़ांचे संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत सर्वच खेळाडूंनी चांगला खेळ केला असून यातील विशेष गटात अॅक्व्अॅथलॉन स्पर्धेत सिद्धार्थ सावंत या अंध खेळाडूने देखील चांगली कामगिरी केली आहे. या स्पर्धेतील प्रथम आलेल्या खेळाडूंची निवड लवकरच राष्ट्रीय स्पर्धेसाठी जाहीर होणार आहे. अशी माहिती असोसिएशनचे यज्ञेश्वर बागराव यांनी दिली.

ट्रायअॅथलॉनमधील कामगिरी
*१५ वर्षांखालील मुली
जुई सावंत- तृतीय स्थान
सोनाली धुरी- चौथे स्थान
*१५ वर्षांखालील मुले
सिद्धेश गोरे – चौथे स्थान
राज मौर्य- पाचवे स्थान
*१८ वर्षांखालील मुली
लुक्ता किरंगे- द्वितीय स्थान
प्रियांका ठक्कर- चौथे स्थान
*१८ वर्षांखालील मुले
मिहीर जाधव- दुसरे स्थान
गणेश भगाटे- चौथे स्थान