24 January 2021

News Flash

ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाचा करोनामुळे मृत्यू

शिवसेना नगरसेवकाचा करोनामुळे मृत्यू झाला असतानाच अजून एक धक्कादायक बातमी

संग्रहित छायाचित्र (एक्स्प्रेस फोटो - प्रशांत नाडकर)

करोनाची लागण झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाण्यातील नगरसेवकाचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिकेअंतर्गत येणाऱ्या कळवा विभागातील या नगरसेवकावर गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरु होते. १४ दिवसांपूर्वी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मंगळवारी रात्री त्यांचं निधन झालं.

“नगसेवक एका करोना रुग्णाला भेटण्यासाठी रुग्णालयात गेले होते. दोन दिवसांनी त्यांनाही करोनाची लक्षणं जाणवू लागली. यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना मुंबईला हलवण्यात आलं. त्यांना डायबेटिस तसंच इतर काही त्रास असल्याने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं,” अशी माहिती एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने दिली आहे.

मिरा भाईंदर महानगरपालिकेतील शिवसेना नगरसेवक आणि गटनेत्याचाही मंगळवारी करोना व्हायरसमुळे मृत्यू झाला. खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी त्यांचं निधन झालं.

५५ वर्षीय नगरसेवकावर दोन आठवड्यांपासून ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन आठवड्यापूर्वी त्यांना करोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्याच्या निधनामुळे मिरा भाईंदर शहरात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नगरसेवकाची पत्नी आणि आईलाही करोनची लागण झाली असून त्यांवर उपचार सुरु आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2020 12:35 pm

Web Title: thane ncp corporator dies due to corona sgy 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 अवजड वाहने पुन्हा मोकाट!
2 कोविड रुग्णालयांत स्थानिक रुग्णांना प्राधान्य
3 खासगी वाहतूकदारांचे नोकरदारांना प्रवासाचे ‘पॅकेज’
Just Now!
X