लोकसत्ता पॉवर्ड बाय आयपीएच प्रस्तुत ‘माइंड फेस्ट’; १३, १४ आणि १५ डिसेंबर रोजी भावनांचा महोत्सव

सध्याच्या धकाधकीच्या काळात घडय़ाळ्याच्या काटय़ावर चालणाऱ्या आणि त्याप्रमाणे वेगवान झालेल्या माणसाला ताणतणावातून जावेच लागते. मात्र अशा वेळेस यापैकी अनावश्यक ताणाचे निराकरण करून वेदान्तविचाराच्या आधारावर व्यक्तिमत्त्वाच्या विकासाविषयी योग्य मार्गदर्शन मिळाल्यास तो सुखी आणि निरामय आयुष्य जगू शकतो. याच दृष्टिकोनातून आयपीएचतर्फे ‘माइंड फेस्ट’ या तीनदिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

‘लोकसत्ता’ पॉवर्ड बाय असणारा हा महोत्सव १३, १४ आणि १५ डिसेंबर रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन समोरील समर्थ सेवक मंडळाच्या पटांगणात पार पडणार आहे. ‘माझ्या जगण्याचं नेमकं काय करायचं अर्थात वेदान्तविचार आणि व्यक्तिमत्त्व विकास’ या संकल्पनेवर आधारित ‘माइंड फेस्ट’ महोत्सव रंगणार आहे. सुप्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी हे या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

मानसिक आरोग्याच्या क्षेत्रामध्ये गेली तीस वर्षे कार्यरत असलेल्या, इन्स्टिटय़ूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ अर्थात आयपीएचच्या विद्यमाने ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘माइंड फेस्ट’ महोत्सवाचे यंदाचे दुसरे पर्व आहे. आयपीएचतर्फे संपूर्ण राज्यात आयोजित करण्यात येणाऱ्या वेध महोत्सवाला २५ पर्व पूर्ण झाल्यानंतर ‘माइंड फेस्ट’ महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर एक वर्ष वेध आणि एक वर्ष माइंड फेस्ट महोत्सव संस्थेकडून ठाण्यात आयोजित करण्यात येऊ  लागला.

शुक्रवार, १३ डिसेंबर; शनिवार, १४ डिसेंबर आणि रविवार, १५ डिसेंबर रोजी दररोज सायंकाळी सहा ते रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान हा महोत्सव रंगणार आहे. सुप्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी हे उपस्थितांना महोत्सवाची संकल्पना असणाऱ्या ‘माझ्या जगण्याचं नेमकं काय करायचं अर्थात वेदान्तविचार आणि व्यक्तिमत्त्व विकास’ यावर दृक्श्राव्य फितींच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत. आयुष्यातील अडचणींचे निराकरण कसे करायचे, दैनंदिन व्यापात प्रसन्नता आणि समाधान कसे शोधायचे, मानसशास्त्राच्या वाटेने जायचे की अध्यात्माच्या, अध्यात्म म्हणजे नेमके काय, भावनिक आणि मानसिक शांततेसाठी जप, पूजा, नामस्मरण, कर्मकांडे करणे गरजेचे आहे का, विज्ञान आणि देवाची सांगड, पुनर्जन्म आहे का या आणि अशा अनेक प्रश्नांवर ज्ञानरंजक पद्धतीने डॉ. आनंद नाडकर्णी उपस्थितांना विज्ञाननिष्ठ निरूपण करणार आहेत. पंचमहाभूते आणि परंपरागत प्रतीके यावर आधारित व्यासपीठ हे यंदाच्या वर्षी ‘माइंड फेस्ट’ महोत्सवाचे वैशिष्टय़ आहे.

असा आहे कार्यक्रम

ल्ल ‘लोकसत्ता’ पॉवर्ड बाय असणाऱ्या यंदाच्या ‘माइंड फेस्ट’ महोत्सवाचे दुसरे पर्व शुक्रवार, १३ डिसेंबर; शनिवार, १४ डिसेंबर आणि रविवार, १५ डिसेंबर रोजी दररोज सायंकाळी सहा ते रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान ठाण्यातील गडकरी रंगायतनसमोरील समर्थ सेवक मंडळाच्या पटांगणात रंगणार आहे.

सुप्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी हे या विषयावर उपस्थितांना महोत्सवाची संकल्पना असणाऱ्या ‘माझ्या जगण्याचं नेमकं काय करायचं अर्थात वेदान्तविचार आणि व्यक्तिमत्त्व विकास’ यावर दृक्श्राव्य फितींच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत.

पूर्व नावनोंदणी आवश्यक

या महोत्सवात सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच महोत्सवाच्या देणगी प्रवेशिका ठाणे पश्चिम येथील आयपीएच बुक काऊंटर, श्री गणेश दर्शन, नववा मजला, तीन पेट्रोल पंपजवळ, एलबीएस मार्ग आणि मॅजेस्टिक बुक स्टॉल, राम मारुती रोड या ठिकाणी उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क- ९८७०६०००७५, ८१०४४७०६३९.