News Flash

ठाण्यात तीन अपघात; दोघांचा मृत्यू

या तिन्ही अपघातप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाण्यातील सर्वाधिक वर्दळीच्या घोडबंदर रस्त्यावर झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांत रिक्षाचालकासह दोघांचा मृत्यू झाला. तर टँकरच्या धडकेत एक कारचालक गंभीर जखमी झाला. या तिन्ही अपघातप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी सकाळी सात वाजता कापूरबावडीजवळ भरधाव ट्रकने मोटारसायकलस्वाराला धडक दिली.त्यात मोटरसायकलस्वाराचा मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत रिक्षाचालक जीवानंद नारायण झा (५२) यांचा रिक्षावरील ताबा सुटल्याने ती उड्डाणपुलाच्या दुभाजकाला धडकली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. तिसऱ्या घटनेत  घोडबंदर मार्गावर कारला टॅंकरने दिलेल्या धडकेत एक जण जखमी झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2016 2:20 am

Web Title: three accident in thane
Next Stories
1 शिळफाटा रस्त्यावर कोंडी
2 बदलापूरजवळ विजेच्या धक्क्याने सहा जनावरांचा मृत्यू
3 पोलीस कर्मचाऱ्याकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग
Just Now!
X