जमिनीच्या वादातून तीन वर्षांपूर्वी उंबर्डे येथील एका देशी बार हॉटेलच्या व्यवस्थापकाची त्याच्याच १५ नातेवाईकांनी निर्घृण हत्या केली होती. या खूनप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी कल्याण न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. तीन वर्षांनंतर या खून खटल्याच्या सुनावणीला कल्याण न्यायालयात प्रारंभ झाला आहे, अशी माहिती सरकारी वकील विकास पाटील-शिरगावकर यांनी दिली.

या प्रकरणातील सर्व आरोपींना येत्या १८ जानेवारीला हजर करण्यात यावे, अशी मागणी अ‍ॅड. पाटील यांनी न्यायालयाकडे केली आहे. वसंत पाटील यांचे मोठे भाऊ रघुनाथ पाटील यांनी उंबर्डे खाडीकिनारी जमीन खरेदी केली होती. ही जमीन आपली असल्याचा दावा काका शंकर पाटील यांनी केला होता. या जमिनीवरून काका व रघुनाथ यांच्या नियमित वाद होत होता. वसंत व रघुनाथ हे सख्खे भाऊ असल्यामुळे वसंत यांची दोन्ही मुले विलास, विकास हे रघुनाथ यांच्या बाजूने नेहमीच भांडणात भाग घेत असत. याचा राग काका शंकर यांना होता. या रागातून नातेवाईकांच्या मदतीने विकासचा काटा काढण्यात आला. या प्रकरणात काका शंकर पाटील, संदीप पाटील, अनिल पाटील, कबीर पाटील, उमेश पाटील, भरत पाटील, शरद पाटील, संजय कारभारी, प्रदीप, यशवंत आणि किसन पाटील, बळीराम, रणशा आणि भगवान पाटील हे आरोपी आहेत. त्यांच्याविरोधात वसंत पाटील यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला होता