प्रेयसीच्या घरात शिरण्यासाठी स्पायडरमॅन सारखे पाईपलाईनवरुन चार मजले चढून जाणाऱ्या युवकाला चोर समजून स्थानिकांनी चोप दिला. विरारच्या फुलपाडामधील डोंगरी भागात सोमवारी ही घटना घडली. सकाळच्या सुमारास पाईपलाईनवरुन चढत असतान या युवकाकडे नागरीकांचे लक्ष गेले. स्थानिकांनी आरडाओरडा केल्यामुळे युवक घाबरला व तो थेट इमारतीच्या गच्चीवर गेला अशी माहिती विरार पोलिसांनी दिली.

प्रेमात घसरला पाय! विवाहित प्रेयसीच्या घरी शिरताना ९ व्या मजल्यावरुन कोसळला

स्थानिकांनी आरडाओरडा करुन इमारतीतील रहिवाशांना सर्तक केले. रहिवाशांनी गच्चीवर धाव घेत पळून जाणाऱ्या त्या युवकाला पकडले व चोप दिला. पाईपलाईनमार्गे आपण तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या प्रेयसीच्या घरात शिरणार होतो अशी कबुली त्याने दिली. यापूर्वी सुद्धा पाईपलाईनच्या मार्गे प्रेयसीच्या घरात प्रवेश केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाही. फुलपाडा भागात घरफोडीच्या अनेक घटना घडल्या आहेत. यातील बहुतांश गुन्ह्यांमध्ये चोराने पाईपलाईनमार्गे घरात प्रवेश केला आहे असे स्थानिकांनी सांगितले. १० जुलैला मुंबईत आग्रीपाडयामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास विवाहित प्रेयसीच्या फ्लॅटमध्ये खिडकीवाटे घुसण्याचा प्रयत्न करत असताना एका १९ वर्षीय युवकाचा नवव्या मजल्यावरुन खाली पडून मृत्यू झाला होता.