News Flash

आई, बाबा, काकांनो मतदान करा!

आई, बाबा, काकांनो मतदान करा. मतदान हा आपला हक्क आहे.

मतदान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांच्या प्रचारफेऱ्या
महापालिका निवडणुकीसाठी अधिकाधिक मतदारांनी मतदान करावे म्हणून कल्याण-डोंबिवली पालिका प्रशासनाने शहरातील शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक यांना हाताशी धरून विभागवार जनजागृती करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. आई, बाबा, काकांनो मतदान करा. मतदान हा आपला हक्क आहे. लोकशाहीतील एक पवित्र कर्तव्य आहे, अशा घोषणा देत विद्यार्थी प्रचार फेऱ्यांमधून दिसत आहेत.
मानपाडा येथील विद्यानिकेतन शाळेचे मुख्याध्यापक विवेक पंडित यांनी महापालिका निवडणुकीसाठी मतदारांना अधिक संख्येने मतदान करावे म्हणून पालक सभा घेऊन मतदानाचा आपला हक्क बजावावा म्हणून आवाहन केले आहे. तसेच, विद्यानिकेतन शाळेच्या शहरात फिरणाऱ्या सर्व शालेय बसवर मतदान जनजागृतीचा संदेश देणारे फलक लावले आहेत. डोंबिवली पश्चिमेतील साई संस्थेच्या गणेश विद्यालयाने ह प्रभाग क्षेत्रात मतदान जनजागृती फेरी आयोजित केली होती. यावेळी मुख्याध्यापिका श्रेया बागवे, शिक्षक हरीश खैरनार, प्रभाग अधिकारी परशुराम कुमावत उपस्थित होते. नवापाडा, गरिबाचा वाडा, महाराष्ट्रनगर, उमेशनगर प्रभागांमधून ही मतदार जनजागृती फेरी काढण्यात आली. महापालिकेचे साहाय्यक जनसंपर्क अधिकारी प्रसाद ठाकूर, पोलीस शांतता समितीच्या सदस्या सुप्रिया कुलकर्णी, नीलेश कुलकर्णी, चाळी, झोपडपट्टी, सामान्य, मध्यमवर्गीयांच्या वस्तीत पालिका पथकासह जाऊन मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत.

मतदानाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी विद्यार्थी जागृती फेऱ्यांमध्ये सहभागी झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2015 2:43 am

Web Title: voting is our right
टॅग : Right,Voting
Next Stories
1 १२१ उमेदवार कलंकित!
2 शहर नियोजनात तरुणांचा सहभाग महत्त्वाचा!
3 नेत्यांच्या प्रचार सभांसाठी फडके रोड बंद..
Just Now!
X