scorecardresearch

ठाणे: खारेगाव भागातील नाल्यात आढळला मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरु

मृतदेह कळवा पोलिसांच्या ताब्यात असून त्याची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.

ठाणे: खारेगाव भागातील नाल्यात आढळला मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरु
प्रातिनिधीक फोटो

कळवा येथील खारेगाव भागात रविवारी नाल्यात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. याप्रकरणाची नोंद कळवा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून सांयकाळी उशीरापर्यंत मृतदेहाची ओळख पटली नव्हती.

खारेगाव येथील टोलनाका भागात रविवारी दुपारी एका नाल्यामध्ये अंदाजे ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह नागरिकांना आढळून आला होता. या घटनेची माहिती कळवा पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस, ठाणे महापालिकेचा अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह नाल्याच्या बाहेर काढला. हा मृतदेह कळवा पोलिसांच्या ताब्यात असून त्याची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 18:02 IST

संबंधित बातम्या