बदलापूर : अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाने कोणतीही प्रक्रिया न करता चिखलोली येथील आरक्षित भूखंडावर कचरा टाकण्यास सुरुवात केल्याने स्थानिक नागरिकांनी पालिकेला हरित लवादात खेचले. पालिकेला आता ही कचराभूमी बंद करायची असल्याने पालिकेने बदलापुरच्या कचरा भूमीवर कचरा टाकण्यासाठी हालचाली सुरू केल्याचे कळते आहे. मात्र बदलापूरच्या कचराभूमी शेजारी असलेल्या वडवली, नवीन अंबरनाथ, वालीवली आणि साई गाव येथील ग्रामस्थांनी या अंबरनाथ नगरपालिकेच्या प्रयत्नांना हाणून पाडण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामस्थांच्या वतीने बदलापूर शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी जन आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे अंबरनाथ पालिकेची कोंडी होण्याची शक्यता आहे.

स्वच्छ भारत अभियानाचे पुरस्कार मिळवणाऱ्या अंबरनाथ शहरात सध्याच्या घडीला कचरा प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित नाही. अंबरनाथ नगरपालिकेच्या कचराभूमीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सुरुवातीला मोरिवली भागात असलेल्या कचराभूमीला स्थानिक नागरिकांचा विरोध होता. मात्र हा विरोध न जुमानता पालिकेने अनेक वर्ष याच कचराभूमीवर कचरा टाकला. तर ,यातून निघणारा दुर्गंध, कचरा भूमीला लागणारी आग, त्यातून निघणारा धूर यामुळे येथील स्थानिक नागरिकांना अनेक वर्ष त्रास सहन करावा लागला. काही वर्षांपूर्वी या भागात कनिष्ठ न्यायालय उभे राहिले. ते सुरू करण्यासाठी न्यायाधीशांच्या दट्ट्यामुळे अंबरनाथ नगरपालिकेने अखेर गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात ही कचराभूमी चिखलोली येथे हलवली.
मात्र पूर्वीप्रमाणे येथे टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया केली नाही.

Three bookies arrested for betting on RCB vs Sunrisers Hyderabad IPL match
आरसीबी आणि सनरायझर्स हैदरबाद आयपीएल सामन्यात सट्टेबाजी, तीन बुकींना अटक
Rajan vichare, nomination,
राजन विचारे करणार २९ एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल, ठाकरे गटाकडून शक्तीप्रदर्शनाची तयारी
Voting machines, Thane, Jitendra Awhad,
ठाण्यात भंगार अवस्थेत सापडली मतदान यंत्रे, मतदान ओळखपत्र सापडल्याने खळबळ, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
jitendra awhad eknath shinde Insult news
“ठाण्यात मुख्यमंत्र्यांचा अपमान, माझ्यासारख्या विरोधकालाही वाईट वाटलं”, जितेंद्र आव्हाडांचा महायुतीला टोला!

हेही वाचा : “आदित्य ठाकरेंवरील ‘त्या’ आरोपांना कायद्याप्रमाणे उत्तर देऊ”, अनिल परबांचा सोमय्यांवर पलटवार, म्हणाले, “किरीट सोमय्या फक्त…”

परिणामी वर्षभरात येथे हजारो टन कचरा येऊन पडला. त्याच्या दुर्गंधीमुळे आसपासच्या नागरिकांचे जगणे मुश्किल झाले. या कचरा भूमीतून निघणाऱ्या सांडपाण्यामुळे आसपासचे जलस्त्रोत दूषित झाले. कूपनलिकांमधून येणारे पाणी दुर्गंधीयुक्त येऊ लागले. शेजारच्या शेतांमध्ये लागवड बंद झाली. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी अंबरनाथ नगरपालिकेला राष्ट्रीय हरित लवादात खेचले. पालिकेने बेकायदा पद्धतीने कचराभूमी सुरू केल्याचा दावा नागरिकांनी केला. राष्ट्रीय हरित लवादाने यावर सुनावणी घेत असतानाच नागरिकांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश अंबरनाथ नगरपालिकेला दिले आहेत. याची पुढील सुनावणी येत्या काही आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे सुनावणीपूर्वी अंबरनाथ नगरपालिकेने चिखलोली येथील ही कचराभूमी हलवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी बदलापूर नगरपालिकेची कचराभूमी मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आहे. मात्र त्यापूर्वीच बदलापूरच्या कचराभूमीशेजारील विविध गावांनी अंबरनाथ नगरपालिकेच्या कचऱ्याला आधीपासूनच विरोध करण्यास सुरुवात केली आहे. या कचराभूमीशेजारी वडवली, वालीवली, साईगाव, जांभूळ आणि नवीन अंबरना या गावांनी अंबरनाथ नगरपालिकेला विरोध करण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा : Cyrus Mistry Death: सूर्या नदीवरील पुलावर झालेल्या अपघाताचं गूढ जर्मनीत उलगडणार? पालघर पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती

बदलापूर शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनीही या ग्रामस्थांच्या वतीने कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश गोडसे यांना पत्र लिहून अंबरनाथ नगरपालिकेचा कचरा बदलापूर पालिकेच्या कचरा भूमीवर घेतल्यास नागरिकांच्या आक्रोशाला सामोरे जावे लागेल, असा थेट इशारा दिला आहे. त्यामुळे अंबरनाथ नगरपालिकेचा कचरा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे. एकीकडे स्वतःच्या नागरिकांसाठी कचराभूमी हटवायची आणि दुसऱ्या शहराच्या कचराभूमीवर कचरा नेऊन टाकायचा या पालिकेच्या दुप्पट भूमिकेवर आता टीका होते आहे. अंबरनाथ शहराचा नागरिकांचा विरोध आणि बदलापूर शहरातील नागरिकांचा भविष्यातील विरोध पाहता अंबरनाथ नगरपालिकेची कोंडी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.