बदलापूर : अनिर्बंध नागरीकरण, काँक्रीटीकरण आणि निसर्गाचा लहरीपणा यामुळे बदलापूरच्या जांभूळ बाजाराला गेल्या काही वर्षांत उतरती कळा लागली आहे. एकेकाळी जांभूळ खरेदीसाठी मुंबई आणि उपनगरातून येथे येणाऱ्या व्यापाऱ्यांचा राबताही थांबला आहे. एकेकाळी बदलापूरची खास ओळख असणाऱ्या या जांभळाच्या बाजाराला नवसंजीवनी देण्यासाठी बदलापुरातील पर्यावरणप्रेमी सरसावले आहेत.
मुंबई आणि उपनगरात एकेकाळी बदलापूरची जांभळे प्रसिद्ध होती. येथील गरवी आणि हलवी अशा दोन जांभळाच्या जाती प्रसिद्ध आहेत. मुंबईतील अनेक व्यापारी स्थानक परिसरात भरणाऱ्या या जांभूळ बाजारातून बोली पद्धतीने जांभूळ खरेदी करत होते. गेल्या काही वर्षांत बदलापूर आणि आसपासच्या परिसरात वाढलेले नागरीकरण आणि कॉंक्रीटीकरणामुळे अनेक जांभळाची झाडे तोडली गेली. त्यात लहरी हवामानाचा उरलेल्या जांभळांच्या झाडांना फटका बसला आहे. त्यामुळे जांभळांचा व्यापार गेल्या काही वर्षांत ८० टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
करोनाच्या संकटात आलेल्या निर्बंधांमुळे उरलासुरला जांभळांचा व्यापारही ठप्प झाला. आता पालघर, गुजरातमधील जांभळांनी बाजारपेठ व्यापली आहे. बाजारातून हद्दपार झालेल्या बदलापूरच्या जांभळांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आता बदलापूर आणि आसपासच्या परिसरातील काही पर्यावरणप्रेमी सरसावले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून जांभूळ या विषयावर जांभूळ परिसंवर्धन आणि समुदाय विकास ट्रस्टकडून काम केले जाते आहे.
आदित्य गोळे, अजिंक्य गोळे, धनंजय गोळे, आशीष गोळे, मोहन जोशी इनामदार यांच्या समूहाने बदलापूरच्या जांभळाला भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले असून जिल्हा नियोजन समितीने या कामासाठी २१ लाखांचा निधी मंजूर केला आहे. गेल्या आठवडय़ात १८ एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालयात जांभुळाच्या भौगोलिक मानांकनासाठी सादरीकरण पार पडले. पुण्यातील मानांकन तज्ज्ञ प्रा. गणेश हिंगमिरे यांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भौगोलिक मानांकनासाठी आवश्यक प्रक्रिया, चाचण्या आणि टप्पे पूर्ण केले जाणार आहेत.
सर्वेक्षण पूर्ण
एकीकडे भौगोलिक मानांकनासाठी प्रक्रिया केली जात असताना या समूहाने नुकतेच बदलापूर आणि पंचक्रोशीतील जांभळांच्या झाडांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. कुळगाव, कात्रप, शिरगाव, बदलापूर गाव, मूळगाव, रहाटोली, एरंजाड, जांभूळ, पादीरपाडा, बोराडपाडा, सागाव, दहागाव – पोई, अंबेशिव, खारिकपाडा, बारवी धरम्ण परिसर, साई वालिवली, सोनिवली, बेंडशीळ या भागात सुमारे १,२५० जांभळांची झाडे असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जांभळांच्या झाडांची लागवड करण्याचा निर्यणयही घेण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, कृषी विभाग, जिल्हा नियोजन विभागाच्या मदतीने इतका पल्ला गाठू शकलो आहोत. प्रा. गणेश हिंगमिरे यांच्या मार्गदर्शनात पुढील प्रक्रिया सुरू आहे. माती परीक्षण आणि स्थानिक जांभळाची लवकरच चाचणी होणार आहे.-आदित्य गोळे, जांभूळ परिसंवर्धन आणि समुदाय विकास ट्रस्ट.

uran, fishers, financial crisis
मत्स्यसंपदा घटल्याने लाखो मच्छीमारांवर आर्थिक संकट
With restrictions on the export of non basmati rice the demand from the domestic market also declined Pune news
आंबेमोहर, कोलमचे दर घसरले; जाणून घ्या, ग्राहकांना काय फायदा होणार ?
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद