कुळगांव-बदलापूर निवडणुकीचे वातावरण सध्या तापले असून येत्या २२ एप्रिलला होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदारांना प्रलोभने देण्याचे काम उमेदवारांकडून होत आहे. असाच प्रकार बदलापुरात घडला असून निवडणूक आचारसंहिता भंगाचा गुन्हा बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे, तर एक जण फरार आहे.
मतदारांना प्रलोभने दाखविण्याच्या हेतूने म्हाडा कॉलनी, बदलापूर (पू.) येथे साडय़ांचे वाटप करीत असल्याची खबर पोलिसांना मिळाली असता पोलीस व निवडणूक आचारसंहिता भरारी पथकांनी कारवाई केली.
याप्रकरणी दीपक वाघमारे व संजय राठोड  मोफत साडय़ा वाटून मतदारांना प्रलोभन दाखवत असल्याचे निदर्शनास आल्याने या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
यात रविचंद चव्हाण हा आरोपी फरारी असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस कॉन्स्टेबल दादाराव बंडगर यांनी फिर्याद नोंदविली आहे.
यावरून ही कारवाई करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक एल. एस. आंबोळे हे अधिक तपास करीत आहेत.

Wardha, sea islands, Shailesh Aggarwal,
वर्धा : समुद्रालगत बेटांवरील मतदारसंघाची जबाबदारी जिल्ह्यातील ‘या’ नेत्याकडे
Ahmednagar, Shirdi, election, sujay vikhe patil,
नगर, शिर्डीमध्ये गेल्या निवडणुकीतील प्रतिस्पर्धी यंदा एकत्र
Lok Sabha polls West Bengal elections
ममतादीदी आणि भाजपा आमनेसामने; एनआयएवरील हल्ल्याचं नेमकं प्रकरण काय?
telugu desam party
“सत्तेत आल्यास उत्तम दर्जाचं मद्य, कमी किंमतीत उपलब्ध करून देऊ”, निवडणुकीपूर्वी चंद्राबाबू नायडूंचं मतदारांना आश्वासन