Video: धावत्या लोकलसमोर अल्पवयीन मुलीने घेतली उडी अन्…

थरकाप उडवणारी घटना सीसीटीव्हीत कैद

धावत्या लोकलसमोर मारली उडी

मध्य रेल्वेच्या बदलापूर स्थानकामध्ये एका अल्पवयीन मुलीने लोकल ट्रेनसमोर उडी मारुन आत्महत्या कारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी (१० फेब्रुवारी रोजी) सायंकाळी पाचच्या सुमारास बदलापूर स्थानकामध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर संपूर्ण प्रकार घडला. लोकल ट्रेन बदलापूर स्थानकात येत असतानाच अचानक एका मुलीने प्लॅटफॉर्मवरुन ट्रॅकवर उडी मारली आणि ती ट्रेनसमोर उभी राहिली. यावेळेस मोटरमनने आपत्कालीन ब्रेक लावल्याने गाडी थांबली. लोकलच्या पुढील भागाची हलकीशी धडक या मुलीला बसली आणि ती रुळावर पडली. गाडी मुलीच्या दिशेने जात असल्याचे पाहून प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांनी मोटरमनने गाडी थांबवावी म्हणून आरडाओरड सुरु केली. एका वयस्कर व्यक्तीने तर मोटरमन केबीनच्या पुढच्या भागास ओढून धरण्याचा प्रयत्न केल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.

मोटरमनने इतर प्रवाशांच्या मदतीने मुलीला प्लॅटफॉर्मवर आणले आणि तिला पाणी पाजले. त्यानंतर या मुलीला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं. पोलिसांनी या मुलीची चौकशी करुन घटलेल्या प्रकारासंदर्भात तिच्या पालकांना कळवले. पोलिसांनी पालकांना बोलवून घेत त्यांना समज दिली. या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Cctv badlapur woman tries to commit suicide in front of local train scsg

ताज्या बातम्या