tvlog01ऐन उन्हाळ्यात थंड पदार्थाकडे आकृष्ट न होणारी व्यक्ती सापडणे कठीण असते. उन्हाळय़ाच्या दिवसांत भजी, वडय़ाच्या गाडीवरील गर्दी आइस्क्रीम, कुल्फी, फळांचा रस, लस्सी आदींच्या दुकानांकडे वळते. त्यामुळेच उन्हाळा आला की थंड पदार्थाच्या विक्रीत तेजी येत असल्याने दरवर्षी मोठमोठय़ा कंपन्याही नवनवीन आइस्क्रीमची भर पाडत असतात. बदलापुरातील सुप्रसिद्ध ‘चितळे आइसक्रीम’ही याला अपवाद नसून येथे पारंपरिक आइस्क्रीमसोबत नवनवीन चवीचा आनंद देणाऱ्या आइस्क्रीमचीही मेजवानी चाखायला मिळते. चितळेंच्या दुकानात मिळणारे गडबड, संडे स्पेशल, मस्तानी या आइस्क्रीम प्रकारांचा आस्वाद घेण्यासाठी प्रत्येक बदलापूरकर उन्हाळय़ात एकदा तरी हजेरी लावतोच.
‘चितळे आइस्क्रीम’मध्ये पारंपरिक आइस्क्रीम व इतर थंड पदार्थाच्या बरोबरीनेच एकूण १६ प्रकारच्या आइस्क्रीम मिळतात. गडबड, मस्तानी, मिल्क शेक, सर्व प्रकारचे फालुदा, सहा प्रकारच्या कुल्फ्या तसेच फळांची नैसर्गिक चवीची आइस्क्रीम ही त्यांची खासियत आहे. त्यातही गडबड व रॉयल फालुदा हे येथील सर्वाधिक आकर्षण असून चार वेगवेगळ्या फ्लेवरचे आइस्क्रीमचे गोळे व मिल्क  शेक, किसमिस, चेरी याने भरलेल्या ‘गडबड’च्या ग्लासला खवय्यांची सर्वाधिक मागणी असते, तर स्ट्रॉबेरी फालुदा, आंबा फालुदा व रॉयल फालुदा यांच्यावरदेखील खाणाऱ्यांच्या उडय़ा पडत असतात. २७ रुपयाला मिळणारा रॉयल फालुदा आता ८० रुपयाला मिळतो. तरीही, त्याचा खप हा वाढलेलाच आहे, असे चितळे आइस्क्रीमचे प्रदीप चितळे सांगतात. यापाठोपाठ खवय्यांच्या पसंतीला उतरते ती येथील मस्तानी आइस्क्रीम. आंबा, स्ट्रॉबेरी, पिस्ता, चॉकलेट असे मस्तानीचे वेगवेगळे प्रकार असून पुण्यापेक्षा चवीला सुंदर अशी त्यांची ख्याती असल्याचे चितळे अभिमानाने सांगतात. मलई, आंबा, गुलकंद, अंजीर, चॉकलेट असे कुल्फीचे नेहमीपेक्षा वेगळे प्रकार येथे मिळत असून त्याचबरोबरीने शहाळे, सीताफळ, जांभूळ, फणस, आंबा, गुलकंद, अंजीर अशी नैसर्गिक चवीची आइस्क्रीम येथे माफक दरात मिळतात. संडे स्पेशल, संडे सिंगल, डबल तसेच व्हॅनिला विथ जेली असे आइस्क्रीमचे वेगवेगळे प्रकार चितळेंकडे मिळतात.

कुटुंबाची साथ म्हणून
बदलापूर पूर्वेकडील कुळगाव भागात २००० मध्ये येथील रहिवासी प्रदीप चितळे यांनी नोकरी करता करता आइस्क्रीम विक्रीचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबातील भाऊ मोहन चितळे, शरद चितळे यांच्या सहकार्याने त्यांनी एका छोटय़ा गाळ्यात हा व्यवसाय सुरू केला. व्हॅनिला, आंबा, पिस्ता, चॉकलेट आदी चार फ्लेवर्स ते स्वत: घरात आटवलेल्या दुधापासून करत असत. त्यांच्या चवीला पसंती मिळते असे कळल्यावर त्यांनी २००२ साली स्वत:चा गाळा घेत दुकानात आइस्क्रीम बनविण्याची यंत्रे घेण्यास सुरुवात केली. तेव्हापासून सुरू झालेली त्यांच्या थंडगार पदार्थाची चव आजही शहरात सगळ्यांच्या ओठांवर रेंगाळत असल्याचे चितळे यांनी सांगितले. कुटुंबीयांच्या सहकार्यामुळेच मी केवळ या व्यवसायात उभा राहिलो आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून सुरू झालेली ही घोडदौड आजही कायम असून पुढील काळातही बदलापूरकर खवय्यांसाठी आइस्क्रीममध्ये नवे-नवे प्रकार आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.

How Sugar Effects On body can digestive cookie make you fat
बिस्किटाच्या पुड्यात किती साखर असते? क्रीम, गोडाची व चटपटीत बिस्किटांची निवड करताना काय बघावं?
Heat wave again in Vidarbha Akola recorded the highest temperature on Friday
विदर्भात पुन्हा उष्णतेची लाट? जाणून घ्या, अकोल्यात पारा कुठे पोहचला
Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
Recipes of raw mango mango sauce recipe in marathi
वाळवण विशेष! घरगुती मसाल्यासह बनवा कैरीचा वर्षभर टिकणारा सॉस; लहान मुलंही खातील आवडीनं

चितळे आइस्क्रीम
पत्ता : अतिथी हॉटेलजवळ,
कुळगाव, बदलापूर (पूर्व)

संकेत सबनीस