scorecardresearch

ठाणे: मोक्काअंतर्गत गुन्हे दाखल असणारा पाच वर्षांपासून फरार असलेला आरोपी CCTV मुळे सापडला

कर्नाटकातील बंगळुरूबरोबरच पुण्यातील कोथरूड भागातही सोनसाखळी चोरी, मोटारसायकल चोरी, मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

Thane Crime
मागील पाच वर्षांपासून पोलीस या आरोपीचा शोध घेत होते

मोक्का कायद्यान्वये गुन्हे दाखल असलेला व मागील पाच वर्षांपासून फरार असलेला हसनैन गुलामरजा सय्यद उर्फ इराणीला डोंबिवलीमधील मानपाडा पोलिसांनी आंबिवलीमधून अटक केली आहे. भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या गुन्ह्यांच्या प्रकरणामध्ये २८ वर्षीय हसनैनविरोधात पोलिसांनी मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे.

गेल्या पाच वर्षापासून हसनैन फार होता. पोलीस त्याच्या मागावर होते. त्याच्यावर कर्नाटकातील बंगळुरूबरोबरच पुण्यातील कोथरूड भागातही सोनसाखळी चोरी, मोटारसायकल चोरी, मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल झालेले आहेत. याशिवाय मानपाडा, विठ्ठलवाडी, कोळसेवाडी, खडकपाडा, रबाळे. तळोजा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत हसनैन याने मोटरसायकली मोबाईल चोरीचे गुन्हे केले आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांना हसनैनचा माग काढता आला, आंबिवलीतील सीसीटीव्ही व्हिडीओंवरुन हसनैन मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत मोटरसायकली, मोबाईल, सोनसाखळ्या चोरत असल्याचे स्पष्ट झाले होते.

मानपाडा पोलीस मागील बऱ्याच काळापासून त्याच्या मागावर होते. हसनैन आंबिवली फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तेथे सापळा लावून हसनैनला अटक केली आहे. देशभरातील २० सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात पाच वर्षापासून फरार असलेल्या हसनैनला पोलिसांनी फिल्मी स्टाईलने अटक केली. कल्याणच्या इराणी वस्तीत महिलांचा गोंधळात या आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. त्याने आठ गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

कल्याण पश्चिमेतील आंबिवली परिसरातील इराणी वस्ती म्हणजे चोरट्यांचा अड्डा आहे. देशभरातील अनेक गुन्ह्यातील आरोपी या वस्तीत राहतात. अनेकदा पोलिसांनी या वस्तीत छापा टाकून कोंबिंग ऑपरेशन केले आहे. अशी एकही वेळ नाही. जेव्हा आरोपी पकडण्यासाठी वस्तीत गेलेल्या पोलिसांसोबत आरोपींचे नातेवाईक आणि वस्तीतील लोकांनी पोलिसांशी वाद घालून झटापट केली नाही. पोलिसांवर महिलांना पुढे करुन दगडफेक करण, गाडी आडवणे, आरोपीला पळवून जाण्यास मदत करणे अशी या वस्तीतील लोकांची मोडस ऑप्रेंडी आहे. यामुळे अनेकदा पोलीस जखमी ही झाले आहे. २००८ साली तर या ठिकाणी छापेमारी करताना पोलिसांना गोळीबार करावा लागला. त्यात दोन जणांचा मृत्यू झाला होता.
डोंबिवलीतील मानपाडा पोलीस स्थानकातील पोलीस अधिकारी सुनिल तारमळे यांच्या पथकाला या वस्तीत पाच वर्षापासून फरार असलेला आरोपी हसनैन सय्यद हा असल्याची माहिती मिळाली. त्या नुसार डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी जे. डी. मोरे, वरिष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस अधिकाऱ्यांनी छापा टाकला. या छाप्या दरम्यान हसनैन हा पोलिसांच्या ताब्यात सापडला. इराणी वस्तीतील महिलांनी पोलिसांवर हल्ला केला. यावेळी पोलिसांसोबत झटापटी झाली. पोलिसांनी हसनैन सय्यदला गाडीत टाकले. त्याला घेऊन थेट मानपाडा पोलीस स्थानक गाठले, अशी माहिती डोंबिवलीचे पोलीस उप निरिक्षक मोरे यांनी दिली.

राज्याच्या इतर भागातील पोलीस ठाण्यात त्याच्यावर एकुण २० गुन्हे दाखल आहेत अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त जय मोरे यांनी दिली. त्याच्याकडून सुमारे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Criminal who was absconding since 5 years caught with help of cctv tlsp0122 scsg

ताज्या बातम्या