डोंबिवलीत धोकादायक इमारत जमीनदोस्त

डोंबिवली पूर्व भागातील आयरे रस्ता येथील एक मजली धोकादायक इमारत ग प्रभागाच्या महापालिका कर्मचाऱ्यांनी मंगळवारी जमीनदोस्त केली.

डोंबिवली पूर्व भागातील आयरे रस्ता येथील एक मजली धोकादायक इमारत ग प्रभागाच्या महापालिका कर्मचाऱ्यांनी मंगळवारी जमीनदोस्त केली.
पावसाळ्यात कोणत्याही क्षणी ही इमारत कोसळण्याची भीती होती. या इमारतीत कोणीही राहत नव्हते. ग प्रभागाचे प्रभाग अधिकारी प्रभाकर पवार यांनी या इमारतीची माहिती घेतली.
परिसरातील रहिवाशांनी ही इमारत तोडण्याची मागणी केली होती. या मागणीचा विचार करून ग प्रभागाच्या पथकाने ही धोकादायक इमारत पोकलेनेच्या साहाय्याने पाडली. याच पथकाने गेल्या आठवडय़ात दत्तनगर भागात एक धोकादायक इमारत पाडली होती.
३९५ इमारती धोकादायक
कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात ३९५ इमारती धोकादायक, २९१ इमारती अतिधोकादायक आहेत. डोंबिवलीतील फ, ग आणि ह प्रभागात २०५ इमारती धोकादायक तर ९१ इमारती अतिधोकादायक ठरविण्यात आल्या आहेत. जुन्या इमारतींन स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dangerous building demolish in dombivali

ताज्या बातम्या