Premium

ठाण्यात डिजिटल प्रचाराची नांदी!

लोकसभा निवडणुकांचे लक्ष्य डोळयांसमोर ठेऊन केंद्र शासनाकडून गाव पातळीवर डिजिटल वाहनांचा उपयोग करून शासनाच्या विविध योजनांचा प्रचार करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

digital campaign by central government start in Thane
केंद्र शासनाच्या योजनांची माहिती देणारी विकसित भारत संकल्प यात्रा (फोटो- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : येत्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकांचे लक्ष्य डोळयांसमोर ठेऊन केंद्र शासनाकडून गाव पातळीवर डिजिटल वाहनांचा उपयोग करून शासनाच्या विविध योजनांचा प्रचार करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ठाणे जिल्हयांतर्गत ४३१ ग्रामपंचायती क्षेत्रात योजनांची माहिती देणारे ही वाहने फिरविली जाणार असून नुकतीच याची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाला केंद्र शासनाकडून विकसित भारत संकल्प यात्रा असे नाव देण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मागील पाच वर्षाच्या कालावधीत केंद्र सरकारने राबविलेल्या विविध योजनांची माहिती थेट गावपाड्यांमध्ये पोहोचविण्यासाठी भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून जाहिरात मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी डिजिटल वाहनांची मदत घेण्यात आली असून या वाहनांवर लावण्यात आलेल्या मोठ्या स्क्रीन द्वारे शासनाच्या विविध योजनांची ध्वनी चित्रफित दाखविली जाणार आहे. या चित्रफितीतून या योजनांची माहिती तसेच लाभ कसा घ्यावा लाभार्थ्यांची पात्रता याबाबत माहिती दिली जाणार आहे. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना या योजनांची माहिती देण्याबरोबरच थेट लाभ मिळवून देण्याची मोहीम देखील या यात्रेदरम्यान राबविली जाणार आहे. ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ २५ नोव्हेंबर करण्यात आला आहे. येत्या २४ जानेवारी २०२४ या दोन महिन्यांच्या कालावधीत ही मोहीम संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या स्तरावर राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून विविध शासकीय योजनांची प्रसिद्धी केली जाणार असून गरजू लाभार्थ्यांचा शोध घेणे, त्यांना प्रत्यक्ष योजनांची माहिती देणे, त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे हे उपक्रम अगदी तळागाळापर्यंत राबविले जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

आणखी वाचा-ठाणे, डोंबिवलीतील गुंतवणूकदारांची चार कोटीची फसवणूक

गर्दीच्या स्थळांची निवड

ठाणे जिल्ह्यात केंद्र शासनाच्या या योजनांची माहिती देण्यासाठी चार वाहने देण्यात आली आहेत. तर केंद्राकडून आलेल्या आदेशानुसार ही वाहने उभी करण्यासाठी गर्दीची ठिकाणे निवडण्यात आली आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात

भिवंडी ग्रामपंचायत- अस्नोली, स्थळ- कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृह, शहापूर ग्रामपंचायत- बोरशेती, स्थळ- ग्रामपंचायत समोर, अंबरनाथ ग्रामपंचायत- पोसरी, स्थळ- शनी मंदिर सभागृह, कल्याण, ग्रामपंचायत- जांभूळ, स्थळ- जिल्हा परिषद शाळेसमोर या ४ ठिकाणी वाहनानाद्वरे योजनांची माहिती देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. याच बरोबर आता पुढील कालावधीत बाजारपेठ, शाळा आणि महाविद्यालय असलेले परिसर ग्रामीण रुग्णालये ठिकाणी ही वाहने उभी करण्यात येणार असून त्याद्वारे योजनांची माहिती दिली जाणार आहे.

आणखी वाचा-ठाणे स्थानकात रेल्वे रूळ ओलांडण्याचे प्रकार सुरूच; गेल्या ११ महिन्यात एक हजाराहून अधिक प्रवाशांवर दंडात्मक कारवाई

या योजनांवर भर

उज्ज्वला योजना, मुद्रा लोन, वंदे भारत ट्रेन, खेलो इंडिया, किसान सन्मान, पंतप्रधान स्वनिधी, पंतप्रधान जन आरोग्य योजना, आवास योजना यांसह अनेक योजनांची माहिती याद्वारे दिली जात आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Digital campaign by central government start in thane mrj

First published on: 29-11-2023 at 17:32 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा