पावसाळ्यात साथीच्या आजारांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागामार्फतत जिल्हा, तालुका आणि प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर साथ नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. तसेच पूरपरिस्थिती दरम्यान नागरिकांच्या मदतीसाठी भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य संस्थेस आवश्यक असे औषधांसह सर्पदंशवरील इंजेक्शनही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली आहे.

पावसाळ्यात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेतर्फे विविध उपायोजना राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावर साथ नियंत्रण कक्ष आणि तीन भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. यात जिल्ह्यात तीन तज्ञ डॉक्टरांचे शिघ्र प्रतिसाद पथक कार्यरत असून येथील आरोग्य विभागात साथ नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. तसेच तालुका, प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर देखील हा कक्ष कार्यान्वित आहे. तालुकास्तरावर भरारी पथक स्थापन करण्यात आले असून त्यामध्ये गट विकास अधिकारी, तालुका वैद्यकिय अधिकारी, तालुका पर्यवेक्षक, आरोग्य कर्मचारी यांचा समावेश आहे. प्रत्येक आरोग्य संस्थेस आवश्यक त्या औषधसाठ्यासोबत सर्पदंशवरील इंजेक्शन सुध्दा उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्याचबरोबर जिल्हास्तरावर जादा औषधसाठा देखील उपलब्ध करण्यात आला आहे. पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे ज्या गावांचा संपर्क तुटतो अशा ठिकाणी आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांना प्राथमिक उपचारासाठी औषधे देण्यात आली आहेत.

Centers Discrimination about onion export Know what is Farmers Association Onion Growers Allegation
कांदा निर्यातीबाबत केंद्राचा दुजाभाव? जाणून घ्या, शेतकरी संघटना, कांदा उत्पादकांचा आरोप
hot temperature, reptiles, snakes affected, cold temperature, enters in citizen colony, marathi news, snake news, snake in uran, uran news, uran snake news,
उरण : उन्हाच्या तडाख्याचा सरपटणाऱ्या प्राण्यांना फटका, गारव्यासाठी नागरी वस्तीत शिरकाव
mumbai, KEM Hospital, Artificial Insemination Center, Project Stalled, Election Code of Conduct, child, Infertility, husband wife, couple for Artificial Insemination, mumbai KEM Hospital,
मुंबई : ‘केईएम’च्या कृत्रिम गर्भधारणा केंद्राला आचारसंहितेचा फटका
navi mumbai, Water Supply Worker, neglect, Leads to Flood Like Situation, main valve broke, water entered the chalwl, water supply workers slept, water waste, kopar khairane news, navi mumbai news, water news, marathi news, water leakage in kopar khairane,
नवी मुंबई : निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी, कर्मचाऱ्यांची झोप नडली; रहिवाशांनी रात्र जागून काढली

सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर पावसाळा सुरू होण्यापूर्वी आवश्यक असणाऱ्या २१ औषधांची यादी पाठविण्यात आली असून तीन महिने पुरेल इतका औषधसाठा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच ग्रामीण भागात संभाव्य आपत्कालीन पूरपरिस्थितीमुळे साथीच्या रोगांचा फैलाव होण्याच्या शक्यतेमुळे सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य पथक, दवाखान्यांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गावात दवंडी देवून पाणी उकळून व गाळून पिणे, पिण्याचे पाण्याचे साठे नियमित ब्लिचिंग पावडरद्वारे शुध्दीकरण केले जाते किंवा नाही त्याची पडताळणी करीता ओ.टी. टेस्ट नियमितपणे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर आपत्कालीन कक्ष तयार करुन वैद्यकिय पथकास प्रथमोपचार किट व मेडिसीन किट तयार करण्याबाबत सुचना देण्यात आल्या असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.