शहापुर तालुक्यातील भातसा धरण रस्त्यावरील बिरवाडी गावातील एका गोदामावर राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाच्या भरारी पथकाने गुरुवारी रात्री छापा टाकून गोवा निर्मित, विदेशी आणि बनावट मद्याचा २६ लाख ८२ हजार रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला शहापुर जवळील बिरवाडी गावातील विठ्ठल लकडे यांच्या घरा मागील कच्च्या पत्र्याच्या गोदामात विदेशी मद्याचा बेकायदा साठा करुन ठेवण्यात आला आहे, अशी माहिती मिळाली होती.

पथकाने प्रथम गोपनीय पध्दतीने या या गोदामाची पाहणी केली. या गोदामात काही साठा असल्याची खात्री झाल्यावर ठाणे भरारी पथकाचे प्रमुख निरीक्षक एन. एन. मोरे, दुय्यम निरीक्षक आर. एस. राणे, गोविंद पाटील, एस. के. वाडेकर, जवान ए. एस. कापडे, एस. के. वाडेकर, ए. बी. भोसले यांचे पथक गुरुवारी रात्री बिरवाडी गावात पोहचले. त्यांनी गोदामावर छापा टाकला.

nashik market committee auction marathi news
नाशिक: व्यापाऱ्यांच्या दबावासमोर प्रशासनाची शरणागती ? तात्पुरता तोडगा काढून बाजार समितीतील लिलाव पूर्ववत
Amul dominates the Mumbai milk market
मुंबईच्या दूध बाजारपेठेवर ‘अमूल’चे वर्चस्व
Dhokli village, Illegal building Dhokli village,
कल्याणमध्ये ढोकळी गावात शाळेच्या आरक्षणावरील बेकायदा इमारत जमीनदोस्त, आय प्रभागाची कारवाई
Smuggling liquor, Delhi to Mumbai, State Excise Department, Seizes 205 Bottles, Foreign Liquor, Arrests one man, crime, marathi news,
दिल्लीवरून मुंबईत मद्याची तस्करी

हेही वाचा : मोठी बातमी! अनिल देशमुख आर्थर रोड जेलमध्ये चक्कर येऊन पडले

गोदामात गोवा निर्मित मद्याचा नऊ लाख ५९ हजाराचा साठा, बनावट मद्यसाठा सहा लाख ९३ हजार, बोलरे पीकअप १० लाख असा एकूण २७ लाखाचा साठा जप्त केला. गोवा निर्मित मद्याचे १२३ खोके, बनावट मद्याचे ९३ खोके आढळून आले. या बनावट मद्य साठा प्रकरणी जवान आर. बी. खैरनार यांनी आरोपी वैभव पुंडलिक शेलार (३१) याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. मद्य साठ्यात मॅगडाॅल, इम्पिरिअल ब्ल्यू, राॅयल स्टॅग, राॅयल चॅलेंज मद्याचा समावेश आहे. गोदामात बनावट मद्य तयार करण्यासाठी लागणारे बाटल्या, बूच, प्लास्टिक बादल्या, ताडपत्री साहित्य जप्त करण्यात आले आहे.

हेही वाचा : मुंबईत १२६४ किलो भेसळयुक्त चहा पूड जप्त

हा मद्यसाठा कोठुण आणला होता. तो कोणाला विक्री केला जाणार होता. आतापर्यंत किती बनावट मद्य, विदेशी मद्याची विक्री करण्यात आली आहे याचा तपास भरारी पथकाने सुरू केला आहे. उत्पादन शुल्क आयुक्त कांतिलाल उमाप, विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे, अंमलबजावणी संचालक सुनील चव्हाण, अधीक्षक नीलेश सांगडे, उपअधीक्षक चारुदत्त हांडे, के. एल. माळवे यांच्या आदेशावरुन ही कारवाई करण्यात आली.