कल्याण – ऑक्टोबरपासून खरीप हंगामात लागवड केलेल्या हरभरा, भेंडी, वाल, गवार, वांगी, टोमॅटो, तूर अशी अनेक पिके नीलगायींचे कळप फस्त आणि नासाडी करत असल्याने ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर, भिवंडी तालुक्यातील शेतकरी हैराण झाला आहे. दिवसभर मेहनत घेऊन फुलविलेली भाजीपाला लागवड रात्रीच्या वेळेत नीलगायींकडून फस्त केली जात असल्याने अनेक शेतकऱ्यांनी येत्या काळात खरीपातील लागवड बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

नीलगायींकडून होणाऱ्या नुकसानीसंदर्भात शेतकरी स्थानिक तहसीलदार, वनाधिकारी, मंडल अधिकारी यांच्याकडे तक्रारी करतात. त्याची दखल घेण्यात येत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या होत असलेल्या या नुकसानीवरून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष डाॅ. प्रकाश भांगरथ यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांना पत्र लिहून नीलगायींच्या (रोहिण) उपद्रवामुळे नोकरी व्यवसाय नसल्याने शेतीत नव्याने उतरलेला तरुण वर्ग हैराण झाला आहे. दिवस-रात्र मेहनत घेऊन ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर, भिवंडी, कोकण विभागातील शेतकरी हरभरा, भेंडी, गवार, तूर, वांगी, टोमॅटो, काकडीची लागवड करतो.

nashik, Unseasonal Rain, Damages Crops, 107 Villages, Nashik District, farmers, nashik Unseasonal Rain, 729 hecters, surgana, trimbakseshwar, baglan, peth, nashik, nashik news, unseasonal rain nashik
अवकाळीचा नाशिक जिल्ह्यातील ७२९ हेक्टरवरील पिकांना फटका
seven houses were burn in fire due to explosion of gas cylinder
जामनेर तालुक्यातील आगीत सात घरे भस्मसात, गॅस सिलिंडरच्या स्फोटाने गाव हादरलेन
nashik water crisis marathi news,
नाशिक जिल्ह्यात तहानलेल्या गावांच्या संख्येत वाढ, आठवडाभरात ५७ गावे-वाड्यांची भर; धरणसाठा २८ टक्क्यांवर
water shortage Nashik district
नाशिक : पाणी टंचाईचे नाशिक जिल्ह्यात दोन बळी, मायलेकीचा विहिरीत पडून मृत्यू

हेही वाचा – मध्य, पश्चिम रेल्वे स्थानकांवर रेल नीरचा तुटवडा; उन्हाचा चटका वाढल्याने पाण्याची मागणी वाढली

ऑक्टोबर ते मे अखेरपर्यंत शेतकरी अशाप्रकारची लागवड करून आपला आर्थिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न करतात. लागवड केल्यानंतर मागील दोन ते तीन वर्षांपासून नीलगायींचे कळप लागवड केलेले पीक रात्रीतून कळपाने येऊन फस्त करतात. नीलगायी राखीव वन्यजीव असल्याने अशा प्राण्यांना काही करता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण होते. नुकसान करणाऱ्या अशा प्राण्यांना जायबंदी करण्यासाठी शासनाने आदेश काढावा, अशी मागणी डाॅ. भांगरथ यांनी वनमंत्री मुगंटीवार यांना केली आहे.

नोकरी, व्यवसायाच्या संधी कमी असल्याने ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तरुण शेतीकडे वळला आहे. हौसेने तो कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेतामध्ये पिके घेत आहे. या पिकांची नासधूस नीलगायींकडून होत आहे. या नासाडीबद्दल शासनाकडून कोणत्याही प्रकारची भरपाई शेतकऱ्यांना मिळत नाही, याची गंभीर दखल शासनाने घ्यावी. नीलगायींचा उपद्रव वाढू लागला, त्यावर शासनाने ठोस भूमिका घेतली नाहीतर, येत्या काळात शेतकरी ऑक्टोबरनंतर खरीप हंगामात घेण्यात येणारी पिके घेणे बंद करतील, असा सूचक इशारा डाॅ. भांगरथ यांनी शासनाला दिला आहे.

हेही वाचा – डोंबिवलीत ज्येष्ठ गायिकेच्या गळ्यातील मंगळसूत्र भुरट्यांनी लांबविले

“वन्यजीव हा संरक्षित वन्यजीव आहे. त्याला मारणे किंवा जायबंदी करता येत नाही. या प्राण्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असेल तर त्यांनी पुराव्यासह माहिती दिली तर त्याची खात्री करून तसा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवून भरपाईचा विचार केला जाऊ शकतो,” असे वन विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

“ठाणे जिल्ह्यातील जंगलांमध्ये नीलगायींची संख्या वाढली आहे. गाव परिसरात नीलगायींचे कळप वावरत असतात. रात्रीच्यावेळेत कळपाने येऊन हे प्राणी लागवड केलेले खरीप हंगामातील पिके फस्त करत आहेत. त्याची भरपाई शेतकऱ्यांना मिळत नाही. या प्राण्यांचा बंदोबस्त, भरपाईचा विषय शासनाने मार्गी लावावा.” अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष डॉ. प्रकाश भांगरथ यांनी केली.