भाईंदर : भाईंदर पश्विमेच्या रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या परिसरात चार  खासगी बस गाडय़ा अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिल्या होत्या. धक्कादायक बाब म्हणजे अद्याप त्या गाडय़ांना पेटवणाऱ्यांचा  शोध लागला नसल्यामुळे गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मागील आठवडय़ात एका खासगी बसमध्ये चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाला होता. त्यामुळे ही आग लावल्याचा संशय व्यक्त होत आहे.

भाईंदर पश्विम परिसरात मोठय़ा प्रमाणात खाजगी बस गाडय़ा उभ्या असतात. शनिवारी  पहाटे ५ च्या सुमारास  चार बसगाडयांना आग लावून पेटवून टाकण्यात आल्या लागल्याचा  प्रकार घडला.या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीत आटोक्यात आणली.  आग कुणी आणि का लावली त्याचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र मागील आठवडय़ात एका खाजगी बस मध्ये ४ वर्षीय चिमुकल्या मुलीवर झालेल्या लैगिक अत्याचाराच्या घटनेमुळे आग लावण्याचे कृत्य केल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलिसांनी मात्र या घटनेला दुजोरा दिला नाही.

चार वर्षीय मुलीवर खाजगी बस चालकांकडून लैगिक अत्याचाराची घटना समोर आल्यामुळे त्याचे राजकीय पडसाद निर्माण झाले आहे.त्यामुळे सर्व पातळीवरून अनधिकृत पद्धतीने उभ्या करण्यात येणाऱ्या बस गाडयांना विरोध दर्शवण्यात येत आहे.मात्र अद्यापही बस गाडय़ांवर  कोणत्याच स्वरूपाची कारवाई करण्यात आली नसल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांंकडून सांगण्यात  येत आहे.तर बस वाहनतळाकरीता  महानगरपालिकेमार्फम्त  जागेचा शोध सुरु असून ‘पे अँड पार्क‘पद्धतीने गाडय़ा उभ्या करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त सदानंद दाते यांनी दिली.

नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर 

मिरा भाईंदर शहरात मोठय़ा प्रमाणत रस्त्याच्या कडेला वाहने उभी करण्यात येतात.शनिवारी पेटवण्यात आलेल्या बस  या  रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या जय अंबे नगर परिसतात उभ्या करण्यात आल्या होत्या. मात्र अद्यापही आगीमागचे मुख्य कारण समजू शकले नसल्यामुळे नागरिकनांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याच प्रकारे भविष्यात असे प्रकार घडल्यास जीवित होनी होण्याची देखील चिंता व्यक्त करण्यात येत आहे.