छुप्या पद्धतीने गुटखा विक्री; पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष

भाईंदर : टाळेबंदीच्या काळात अनेक जिन्नस मिळणे दुरपास्त झाले असताना प्रतिबंधित तंबाखू, सिगारेट व तंबाखू जन्य गुटखा व पानमसाले छुप्या पद्धतीने उपलब्ध होत आहेत. मात्र त्यांचे दर गगनाला भिडले असून १०० ते १३० पट महाग दराने त्यांची विक्री होत आहे.

cold water sold in the name of mineral water
मिनरल वॉटरच्या नावाखाली थंड पाण्याची विक्री ! शासकीय यंत्रणा ढिम्म
white onion alibag marathi news
विश्लेषण: अलिबागचा पांढरा कांदा आजही भाव का खातो? उत्पादन किती? बाजारपेठ किती? वैशिष्ट्य काय?
article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व – परीक्षास्वरूप आणि अभ्यासक्रम
mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!

मीरा-भाईंदर शहरात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत असल्यामुळे प्रशासनाकडून ३ मेपर्यंत पूर्णत: टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. परंतु अशा परिस्थितीतदेखील अनेक तळीराम रस्त्यावर आढळून येत आहेत. त्यात तंबाखू आणि गुटख्याच्या शोधात निघणाऱ्या नागरिकांची देखील भर पडली आहे. अनेक नागरिकांना तंबाखू खाण्याचे व्यसन असल्यामुळे तिच्या खरेदीकरिता हवी ती  रक्कम मोजण्यास ते तयार आहेत. त्यामुळे अशी विक्री करणाऱ्यांची चंगळ झाली आहे. ऐरवी ६ रुपयांना मिळणारी तंबाखूची पूडी तब्बल १५० रुपयांना विक्री केली जात आहे.

राज्यात गुटखा विक्रीस बंदी असताना देखील सर्रास पणे विकला जाणारा गुटखा आता इतका महाग झाल्याचे समोर आले आहे. याशिवाय दारू विक्रीदेखील नफेखोरीने होत आहे. पोलीस प्रशासनाने या सर्व गोष्टीची गांभीर्याने दखल घेऊन कडक कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

 

नाव           तंबाखूचे  आधीचे  दर           तंबाखूचे टाळेबंदीतले वाढलेले दर

हत्ती छाप      ६                                          १५०

पंढरपुरी         १०                                         १३०

गाय छाप       १०                                          १५०

 

डहाणूत चारपट दराने विक्री

डहाणू तालुक्यातील शहर आणि ग्रामीण भागात  छुप्या मार्गाने गावठी  दारु, गुठखा, तंबाखूची विक्री  जोरात सुरू आहे. चार पटी दराने त्याची विक्री होत असून  ६० रुपये  दारुची बाटली  ८० रुपयांना विकली जात आहे. तर  काही भागात  १२० ते २०० रुपये पर्यंत दर वधारले आहेत. तंबाखूच्या पुडीचे दर ६ रुपयांवरुन  १५ रुपये झाली तर काही भागात २०  ते ३० रुपये झाला आहे. १४० रुपयांना मिळणारी  गुटख्याची माळ ६०० ते ७०० रुपयांना विकली जात आहे.