scorecardresearch

भिवंडीत ५५ लाख रुपयांचा गुटखा जप्त

पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने बासुरी उपाहारगृह येथून वाहतूक करणारा एक ट्रक अडविला.

भिवंडीत ५५ लाख रुपयांचा गुटखा जप्त
( संग्रहित छायचित्र )

मुंबई नाशिक महामार्गावरील बासुरी उपाहारगृहाजवळ ठाणे पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाने ५५ लाख ४० हजार रुपयांचा गुटखा गुरुवारी जप्त केला आहे. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आसीफ रहिम (२८) याला अटक केली आहे.
मुंबई नाशिक महामार्गावरून तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक होणार असल्याची माहिती कोनगाव पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनास मिळाली होती.

त्यानुसार पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने बासुरी उपाहारगृह येथून वाहतूक करणारा एक ट्रक अडविला. त्यामध्ये ५५ लाख ४० हजार रुपये किमतीचा गुटखा पथकास आढळून आला. या घटनेप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी ट्रक चालक आसिफ रहिम याला अटक केली आहे.

मराठीतील सर्व ठाणे न्यूज ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gutkha worth rs 55 lakh seized in bhiwandi amy

ताज्या बातम्या