Premium

कल्याण मधील रोझाली सोसायटीत पदाधिकाऱ्यांकडून साडे चार लाखांचा अपहार, प्रशासकाकडून गुन्हे दाखल

अपहार प्रकरणी प्रशासनाने रोझाली सोसायटीच्या तीन माजी पदाधिकाऱ्यांविरूध्द खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

kalyan rosalie society fraud news in marathi, rosalie society fraud of rupees 4 lakh 50 thousand
कल्याण मधील रोझाली सोसायटीत पदाधिकाऱ्यांकडून साडे चार लाखाचा अपहार, प्रशासकाकडून पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल (संग्रहित छायाचित्र)

कल्याण : येथील गोदरेज हिल भागातील उच्चभ्रूंची वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोझाली सोसायटीच्या प्रशासकीय कामात तत्कालीन अध्यक्षांसह इतर तीन पदाधिकाऱ्यांनी चार लाख ६८ हजार रूपयांचा गैरव्यवहार केल्याचे प्रशासकाने केलेल्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. या अपहार प्रकरणी प्रशासनाने रोझाली सोसायटीच्या तीन माजी पदाधिकाऱ्यांविरूध्द खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोझाली सोसायटीचे १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१६ या कालावधीत सुरेश बुधराणी अध्यक्ष, मनोज पाटील सचिव, विरेंद्र पोपट खजिनदार होते. या तीन पदाधिकाऱ्यांनी सोसायटीचा प्रशासकीय कारभार हातात आल्यानंतर संस्थेच्या कामात विविध प्रकारच्या माध्यमातून चार लाख ६८ हजार रूपयांचा गैरव्यवहार केला. या प्रकरणी इतर सदस्यांनी तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींवरून सोसायटीवर प्रशासक नेमण्यात आला होता.

हेही वाचा : ठाणे : क्रीडासंकुलातील बांधकामांना दंडात्मक शुल्क

प्रशासकाच्या चौकशीत गैरव्यवहार उघडकीला आला. आरोपी बुधराणी, पाटील, पोपट यांच्या कालावधीत हा गैरव्यवहार झाला असल्याने खडकपाडा पोलिसांनी प्रशासक प्रकाश मांढरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक एस. ए. गवळी तपास करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In kalyan rosalie society fraud of rupees 4 lakh 50 thousand administrator filed cases against office bearers css

First published on: 07-12-2023 at 14:14 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा