कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने सोमवारी आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट दिली आहे. महापालिकेतील कायम कर्मचारी व अधिकाऱ्यांना १५ हजार रूपये बोनस देण्यात येणार असल्याची घोषणा महानगरपालिकेच्या प्रशासनाने केली. मागील वर्षी कर्मचाऱ्यांना १३ हजार रूपयांचा बोनस देण्यात आला होता. यंदा यामध्ये दोन हजारांची वाढ करण्यात आली आहे. गेल्यावर्षी कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवातच  दिवाळीचा बोनस देण्यात आला होता. दिवाळी बोनस देताना कामगार संघटनेबरोबर पालिकेच्या चर्चेच्या फेऱ्या होतात. पालिकेची आर्थिक परिस्थिती पाहून बोनस जाहीर केला जातो.
तत्पूर्वी मागील आठवड्यात नवी मुंबई महानगरपालिकेने कर्मचाऱ्यांना १६ हजार रूपये बोनस तर कंत्राटी कामगारांना ८ हजार रूपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला होता. महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना गतवर्षी दिवाळीत १५ हजार रूपये बोनस देण्यात आला होता. यंदा त्यात एक हजार रूपयांची वाढ करून १६ हजार रूपये बोनस म्हणून देण्यात येणार आहे. महापालिका प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही या वेळी आठ हजार रूपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. गतवर्षी कंत्राटी कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळवण्यासाठी आंदोलन करावे लागले होते. नवी मुंबई महानगरपालिकेत सुमारे १३ हजाराहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.

mumbai municipal corporation, transparent administration
मुंबई महापालिकेचा कारभार पारदर्शी होणार? नागरिकांशी संवाद, संपर्क वाढविण्याचे मनपा आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आवाहन
HC orders Mumbai Municipal Corporation to devise alternative policy for unlicensed hawkers
विनापरवाना फेरीवाल्यांसाठी पर्यायी धोरण आखा, उच्च न्यायालयाचे मुंबई महानगरपालिकेला आदेश
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद
percentage of voting in Mumbai,
मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे शहरांतील मतदानाचा टक्का वाढणार कसा ? मतदारांचा निरुत्साह दूर करण्यावर निवडणूक आयोगाचा भर