ठाण्यात उद्या रोजी मार्गदर्शन कार्यक्रम; ‘लोकसत्ता-अर्थब्रह्म’ वार्षिकांकाचा प्रकाशन सोहळा

केंद्रीय हंगामी अर्थसंकल्पानंतर ३७ हजाराच्या कळसाला पोहोचलेल्या ‘सेन्सेक्स’ला अनिश्चिततेने घेरले. बाजारात तेजीबाबत अनिश्चिततेची स्थिती असताना गुंतवणूकदारांचे पुढचे पाऊल काय आणि कसे असावे, याचे नेमके मार्गदर्शन ‘लोकसत्ता – अर्थब्रह्म’ गुंतवणूकदार जागरातून येत्या बुधवारी होणार आहे. याच कार्यक्रमात ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’ या गुंतवणूकदारांना मार्गदर्शक सहाव्या वार्षिक अंकाचे प्रकाशनही होणार आहे.

‘आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंड’ प्रस्तुत हा  कार्यक्रम बुधवार, २७ फेब्रुवारी २०१९ रोजी सायंकाळी ६ वाजता, हॉटेल टिप-टॉप प्लाझा, तीन हात नाका, ठाणे (प.) येथे होत आहे. एलआयसी, बँक ऑफ महाराष्ट्र, एलआयसी हाऊसिंग फायनान्स आणि मिरॅडोर रिअ‍ॅल्टी हे उपक्रमाचे पॉवर्ड बाय सहयोगी आहेत.

यंदाच्या अर्थसंकल्पातून व्यक्तिगत प्राप्तिकराच्या रचनेत कोणताही बदल नसला, तरी गुंतवणुकीद्वारे करबचतीला मात्र भरपूर वाव दिला आहे. यामुळे या गुंतवणुकीच्या धोरणात काही बदल करणे आवश्यक आहे काय आणि पर्याय कोणते या बाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन ‘लोकसत्ता – अर्थब्रह्म’ गुंतवणूकदार जागरातून होणार आहे.

कुटुंबाच्या आर्थिक अंदाजपत्रकावर परिणाम करणाऱ्या अर्थसंकल्पातील तरतुदींचा पैलू उलगडून दाखविणारे आणि अशा स्थितीत गुंतवणुकीचे नेमके मार्ग आणि पर्याय यांचे तज्ज्ञांद्वारे दिशादर्शन यानिमित्त होईल. याच कार्यक्रमात ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’ या गुंतवणूकदारांना मार्गदर्शक सहाव्या वार्षिक अंकाचे  प्रकाशनही होणार आहे.

लोकसत्ता- अर्थवृत्तान्तचे नियमित स्तंभलेखक आणि भांडवली बाजार अभ्यासक अजय वाळिंबे, सनदी लेखाकार प्रशांत चौबळ हे या कार्यक्रमाचे तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत. उपस्थितांना आपल्या मनातील प्रश्न आणि शंका या तज्ज्ञ वक्त्यांना विचारण्याची संधी मिळेल. कार्यक्रम विनामूल्य आणि प्रवेश सर्वाना खुला असून, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य राहील. काही जागा मात्र निमंत्रितांकरिता राखीव असतील.

सध्याच्या परिस्थितीत या गुंतवणुकीच्या धोरणात काही बदल करणे आवश्यक आहे काय आणि पर्याय कोणते या बाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन गुंतवणूकदारांसाठी निश्चितच उद्बोधक ठरेल.