शेतीच्या बांधावर, रानात उगवलेल्या अळंबीची मागणी वाढली; ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना रोजगार

शेतीच्या बांधावर आणि रानात उगवलेल्या अळंबीला वसईच्या बाजारात मागणी वाढली असून ती खरेदी करण्यासाठी खवय्यांची गर्दी वाढली आहे. ग्रामीण भागातील शेतकरी या अळंबीची विक्री करत असून त्याचा त्यांना आर्थिक फायदा होत आहे.

Centers Discrimination about onion export Know what is Farmers Association Onion Growers Allegation
कांदा निर्यातीबाबत केंद्राचा दुजाभाव? जाणून घ्या, शेतकरी संघटना, कांदा उत्पादकांचा आरोप
three thousand families staying near waldhuni river boycotting lok sabha election, construction within river bed
कल्याणमध्ये वालधुनी नदी परिसरातील तीन हजार कुटुंबीयांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार
increase in the number of floodplains Water pumping pumps at 481 places during monsoon
जलमय सखल भागांच्या संख्येत वाढ? पावसाळ्यात ४८१ ठिकाणी पाणीउपसा पंप; खर्चातही वाढ
Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट

पावसाळ्यात वसईच्या बाजारात रानभाज्या येतात. विरार पूर्वेकडील शिरसाड, जांभुळपाडा, खार्डी, शिरगाव, वज्रेश्वरी, कोशिंबे, कण्हेर, खानिवडे तर वसई पूर्वेकडील कामण, सकवार, पेल्हारपासून अगदी महामार्गावर असणाऱ्या पाडय़ांतून रानभाज्या विक्रीसाठी वसई, विरार, नालासोपारा स्थानकांजवळील बाजारपेठांमध्ये येतात. पाऊस ओसारल्यानंतर या भाज्यांचे प्रमाण कमी झाले आहे, मात्र शेतीच्या बांधावर, ओसाड जमिनीवर, रानात उगवलेल्या अळंबी येथील शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे स्रोत बनले आहे. ही अळंबी एका दिवसांतच नष्ट होत असल्याने सकाळीच ती काढून बाजारात विक्री केली जाते. निर्मळ, भुईगाव, नायगाव, उमेळा, गिरीज, बोळींज, आगाशी येथील शेतकरी दररोजच ही अळंबी बाजारपेठांमध्ये घेऊन जात आहे.

आदिवासी बांधवाना पावसाळ्यात रानभाज्यांमुळे एक प्रकारच्या व्यवसायाचे साधन उपलब्ध होते. त्यातच अळंबी मोठया प्रमाणात उगवत असल्याने त्या जमा करण्यासाठी सकाळीच लगबग सुरू होत आहे. या अळंबीला ग्राहकांकडूनही अधिक मागणी होत आहे. सध्या वसई गाव, माणिकपूर, विरार पूर्व महापालिका कार्यालयासमोरील बाजार, बोळींज, निर्मळ आदी ठिकाणी किलोप्रमाणे अळंबी विकली जात आहे. एका किलोला १०० ते ११० असा भाव मिळत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

बाजारात खरेदीदारांची गर्दी

रानात उगवलेल्या चविष्ट अळंबीला मागणी वाढतच आहे. मात्र विक्रेते सकाळी आणि संध्याकाळी ठरावीक वेळेतच विक्रीसाठी येत असल्याने या वेळेत बाजारांमध्ये खरेदीदारांची मोठी गर्दी होत आहे.