scorecardresearch

कल्याणमध्ये पादचारी महिलेला लुटले; १ लाख ६५ हजारांचा सोन्याचा ऐवज लंपास

खडकपाडा भागातील सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

crime
(प्रातिनिधीक फोटो)

कल्याण पश्चिमेतील खडकपाडा भागात रात्रीच्या वेळेत एका पादचारी महिलेला अडवून तिच्या गळ्यातील एक लाख ६५ हजार रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज दोन अज्ञात तरुणांनी हिसकावून पळ काढला. या महिलेच्या तक्रारीवरून खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

धारा जलोरा (२३) ही महिला कल्याण पश्चिमेतील खडकपाडा भागातील साई संकुल निवास येथून रात्री आठ वाजता पायी जात होती. याच भागातील गौरव इमारती समोरून जात असताना तिच्या पाठीमागून दुचाकीवरून दोन तरुण आले. त्यांनी दुचाकी अंगावर घालण्याचा प्रयत्न केल्याने ती घाबरली. या महिलेला काही कळण्याच्या आत दुचाकीस्वारांनी तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि सोनसाखळी असा एकूण १ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज हिसकावून पळ काढला. या महिलेने ओरडा करेपर्यंत चोर पळून गेले. या महिलेने या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

खडकपाडा भागातील सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. खडकपाडा भागात दररोज सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत रहिवासी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडतात. आठवड्यातून दोन ते तीन वेळा महिलांच्या गळ्यातील ऐवज लुटण्याचे प्रकार या भागात घडतात असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pedestrian was robbed at khadakpada in kalyan abn

ताज्या बातम्या