प्रारूप प्रभाग रचना वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे

ठाणे : आगामी ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेबाबत राजकीय पक्षांकडून आक्षेपांची मालिका सुरू झाली आहे. मुंब्य्रात वाढलेले प्रभाग आणि दिव्यात घटलेले प्रभाग यामुळे अस्वस्थ झालेल्या शिवसेनेने आक्षेप घेतले आहेत, तर काही राजकीय पक्षांना अनुकूल असलेली प्रभाग रचना संपूर्णपणे रद्द करून नवी प्रभाग रचना करण्याची मागणी भाजपने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून चुकीच्या पद्धतीने प्रभाग रचना करण्यात आल्याचा आरोप लोकमान्यनगर भागातील राष्ट्रवादीचे प्रभावी नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी केला आहे. यामुळे पालिकेच्या प्रभाग  रचनेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून त्याचबरोबर ही रचना वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत.

Buldhana lok sabha, Buldhana,
बुलढाण्यात पक्षीय उमेदवारांसह अपक्षांचीही अग्निपरीक्षा; मतांचे ध्रुवीकरण, विभाजन ठरणार निर्णायक!
narendra modi
पंतप्रधानांकडून प्रचारात जुनेच मुद्दे; विरोधकांची टीका, मित्रपक्षांचीही भिस्त मोदींवरच
Kachathivu Island
लेख: निवडणूक प्रचारात कचाथीवूचा शंखनाद!
parful patel
प्रफुल पटेल यांना निर्दोषत्व! विमान भाडेकरार घोटाळाप्रकरणी सीबीआयकडून फाइल बंद

ठाणे महापालिका निवडणुकीसाठी पालिकेची प्रारूप प्रभाग रचना मंगळवारी जाहीर करण्यात आली. राजकीय पक्षांनी आता प्रभाग रचनेबाबत आक्षेप घेण्यास सुरुवात केली आहे. प्रभाग रचना करताना भौगोलिक सलगता राहील, याची काळजी घ्यावी. प्रभागाच्या सीमारेषा, मोठे रस्ते, गल्ल्या, नद्या, नाले, डोंगर, रस्ते, उड्डाणपूल या नैसर्गिक मर्यादा विचारात घेऊन निश्चित करावी. कोणत्याही परिस्थितीत एका इमारतीचे, चाळीचे, घराचे विभाजन दोन प्रभागांमध्ये होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मार्गदर्शक तत्त्वे निवडणूक आयोगाने आखून दिली होती. या तत्त्वांचे उल्लंघन करून ठाणे महापालिकेची प्रभाग रचना तयार करण्यात आली आहे. तसेच प्रभाग रचना तयार करण्यासाठी पालिकेच्या समितीची बैठकच झालेली नसल्याचा आरोप लोकमान्यनगर भागातील राष्ट्रवादीचे प्रभावी नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी केला आहे. या रचनेबाबत आक्षेप नोंदविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महापालिकेच्या निवडणुकीसाठी झालेली प्रभाग रचना ही केवळ सत्ताधाऱ्यांना लाभ व्हावा, या दृष्टीने हेतुपुरस्सर पद्धतीने करण्यात आली. त्यात सत्ताधाऱ्यांकडून स्पष्टपणे हस्तक्षेप झाला आहे. लोकसंख्येच्या आधारावर किंवा भौगोलिक दृष्टिकोनाने प्रभाग रचना केली जाते; परंतु रचना करताना काही राजकीय पक्षांना फायदा व्हावा, त्यांच्या नगरसेवकांच्या संख्येत वाढ व्हावी, हा उद्देश ठेवण्यात आला होता. त्यामुळे या प्रभाग रचनेला भाजपचा आक्षेप आहे. राज्य निवडणूक आयोगाने लोकहित व लोकन्यायासाठी हस्तक्षेप करून प्रभाग रचना सुरळीत करण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे केली असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष डावखरे यांनी सांगितले. काही राजकीय पक्षांना अनुकूल असलेली व सध्या जाहीर केलेली प्रभाग रचना संपूर्णपणे रद्द करून नवी प्रभाग रचना करावी, अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दिवा परिसरात सद्य:स्थितीत चार सदस्यांचे दोन प्रभाग असून या प्रभागात नगरसेवक संख्या आठ होती. या भागाची लोकसंख्या गेल्या काही वर्षांत वाढली आहे. त्यामुळे नव्या प्रभाग रचनेत या भागात नगरसेवक संख्या वाढण्याची चिन्हे होती. प्रत्यक्षात मात्र या ठिकाणी आठऐवजी सात नगरसेवकांची प्रभाग रचना तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये एक प्रभाग चार सदस्यांचा, तर दुसरा प्रभाग तीन सदस्यांचा आहे. या भागातील काही परिसर मुंब्य्राला जोडून देसाई डायघर असा ४६ क्रमांकाचा प्रभाग तयार करण्यात आला आहे. दिवा भागात तीन प्रभाग होऊ शकत होते; परंतु या ठिकाणी ५७ हजार लोकसंख्येचा चार सदस्यांचा, तर ४२ हजार लोकसंख्येचा तीन सदस्यांचा प्रभाग तयार करण्यात आला आहे, शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमाकांत मढवी यांनी सांगितले. 

‘चुकीच्या पद्धतीनेच रचना’

दिव्यातील गावे मुंब्य्राला जोडून करण्यात आलेल्या प्रभागाची लोकसंख्या ३८ हजार इतकी आहे. या भागात जास्त लोकसंख्येचे प्रभाग तयार करण्यात आल्याने प्रभागांची संख्या कमी झाली, तर मुंब्य्रात मात्र ३४ ते ४५ हजारांचे लहान प्रभाग करण्यात आल्याने या ठिकाणी प्रभाग संख्येत वाढ झाली आहे. चुकीच्या पद्धतीने ही रचना करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमाकांत मढवी यांनी केला आहे.