अपघाताची शक्यता असल्याने रहिवाशांमध्ये भीती; पोलीस कारवाईची मागणी

सध्या वसईच्या सनसिटी परिसरात कर्णकर्कश आवाज करत वेगाने मोटारसायकल चालविणाऱ्या तरुणांच्या त्रासाने रहिवासी त्रस्त झाले आहेत. तसेच वेगाने चालणाऱ्या या वाहनामुळे अपघाताचीदेखील शक्यता असल्याने सनसिटी परिसरात फिरण्यासाठी येणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Stone Pelting in West Bengal
Ram Navami : पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, मिरवणुकीत दगडफेक; पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर!
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
demolition of seven bungalows became controversial
विश्लेषण : सात बंगल्यातील पाडकाम वादग्रस्त का ठरले? मजबूत वास्तू धोकादायक घोषित करण्यामागे पालिका-विकासकांचे साटेलोटे?
thane traffic
कल्याण: पत्रीपुलावर दोन तासांपासून वाहनांच्या रांगा

वसई पश्चिमेचा ‘सनसिटी ग्रास’ या रस्तावर सकाळ, संध्याकाळ फिरण्यासाठी येणाऱ्यांची संख्या अधिक असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावरून वेगाने मोटारसायकल चालविण्याच्या वेडाने तरुणांना झपाटले असून ध्वनिप्रदूषण करणाऱ्या हार्ली डेविडसन, रॉयल एनफील्ड, डुकॅटी, ट्रायम्प, निन्जा अशा दुचाकी वाहनांची वर्दळ या ठिकाणी वाढली आहे. या मोटारसायकलीवर वेगाने विविध कर्तब दाखवणे, चुकीच्या पद्धतीने वाहनांना मागे टाकणे, असे प्रकार सर्रासपणे सुरू असतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही. याशिवाय होणाऱ्या ध्वनिप्रदूषणामुळेदेखील रहिवासी त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे, सनसिटीच्या प्रवेशद्वराजवळ एक पोलीस चौकीदेखील आहे. मात्र जेव्हा या चौकीत पोलीस असतात तेव्हा पोलिसांदेखत वेगाने मोटारसायकल चालविण्याचे प्रकार चालतात.

या रस्त्यांवर वाहनाची वेगमर्यादा नियंत्रणाखाली ठेवण्यासाठी स्पीड ब्रेकर आहेत, मात्र त्याचादेखील परिणाम झालेला दिसत नाही. त्यामुळे पोलिसांनी आता या धूम स्टाइलने मोटारसायकल चालविणाऱ्यांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून होत आहे.