नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्याचे खासदार राजन विचारे हे लोकसभेत शिवसेनेचे नवे मुख्य प्रतोद असतील. यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी यांच्याऐवजी विचारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकसभेतील शिवसेनेच्या मुख्य प्रतोद बदलाची माहिती राज्यसभेतील शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांना पत्र पाठवून दिली. संसदेचे पावसाळी अधिवेशन १८ जुलै रोजी सुरू होत असून त्याच दिवशी राष्ट्रपती पदासाठी मतदान होणार आहे.

Omraje nimabalkar Archana Patil Sanyojini Raje nimbalkar have purchased nomination papers
ओमराजे, अर्चना पाटील, संयोजिनी राजे यांनी घेतले उमेदवारी अर्ज, लोकसभेसाठी चौथ्या दिवशी तीन उमेदवारी अर्ज दाखल
Prime Minister Narendra Modis meeting in Baramati Lok Sabha Constituency
‘बारामती’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा?
Ramdas Athawale
महायुतीमध्ये आम्ही नाराज, पुढील तीन दिवसांत निर्णय घेऊ, रामदास आठवलेंचा इशारा
sangli lok sabha
उबाठा शिवसेनेचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर सांगलीत कॉंग्रेसचे ‘वेट ॲण्ड वॉच’

राज्यातील शिवसेनेच्या आमदारांच्या बंडानंतर खासदार भावना गवळी यांनी शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून भाजपशी युती करण्याची विनंती केली होती. खासदार राहुल शेवाळे यांनीही उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची विनंती केली होती. शिंदे गटातील बंडखोर आमदार गुलाबराब पाटील यांनी शिवसेनेचे डझनभर खासदार शिंदे गटात सामील होतील, असा दावा केला होता.

आमदारांनंतर खासदारांकडूनही संभाव्य बंडाची शक्यता व्यक्त केली जात असल्याने शिवसेनेने लोकसभेतील मुख्य प्रतोद बदलण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. लोकसभेत शिवसेनेचे १८ खासदार असून राज्यसभेत तीन खासदार आहेत.