कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत मावळत्या महापौर कल्याणी पाटील यांच्यासह अनेक मातब्बर नगरसेवकांना पराभवाची धूळ चाखावी लागली. यामध्ये वर्षांनुवर्षे निवडून येणाऱ्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेवकांचा समावेश असून सभागृह नेते कैलास शिंदे, ज्येष्ठ नगरसेवक अरविंद पोटे, त्यांची पत्नी विजया पोटे आणि मुलगी सोनाली पोटे, शहरप्रमुख सदानंद थरवळ यांचे पुत्र अभिजीत थरवळ, श्रीमंत नगरसेवकांमध्ये गणले जाणारे नगरसेवक रवी पाटील यांचाही समावेश आहे. एकीकडे पराभवाचे धक्के बसत असताना माजी महापौर वैजयंती घोलप आणि स्थायी समितीचे सभापती दीपेश म्हात्रे यांचा विजय शिवसेनेसाठी दिलासादायक ठरला आहे.

शिवसेनेसाठी हक्काच्या मानल्या जाणाऱ्या या जागा होत्या. याशिवाय सचिन बासरे, अरविंद मोरे, वसंत भगत, जयंता पाटील हे उमेदवारही पराभूत झाले आहेत. या उमेदवारांच्या पराभवामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला असून सत्तेचे गणित बिघडल्याचे चित्र स्पष्टपणे पुढे आले आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँगेस, काँग्रेस तसेच मनसे या तिन्ही पक्षांची पिछेहाट झाली असून या पक्षातील अनेक मातब्बरांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीचे उमेश बोरगावकर, त्यांची पत्नी निर्जला बोरगावकर, काँग्रेसचे जितेंद्र भोईर, मनसेचे उल्हास भोईर, मंदा पाटील आणि कोमल निग्रे यांचा समावेश आहे. कल्याणमधील पारनाका प्रभागावर आजवर भाजपचा वरचष्मा राहिला होता. तेथून पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेविका शुभा पाध्ये यांचा पराभव झाला. गेल्या निवडणुकीत पाध्ये या निसटत्या मताधिक्याने विजयी झाल्या होत्या. त्यांना उमेदवारी देऊ नये यासाठी भाजपमधील एक मोठा गट आग्रही होता. मात्र, आमदार नरेंद्र पवार यांनी हा आग्रह मानला नाही आणि पारनाक्याची हक्काची जागा गमावून बसले.

malhar patil om rajenimbalkar
“पप्पा भाजपात, मम्मी राष्ट्रवादीत, त्यामुळे मल्हार पाटलांचा…”, ओम राजेनिंबाळकरांचा टोला
Dharamrao Baba Atram vijay wadettiwar
“विजय वडेट्टीवारांनी भाजपा प्रवेशासाठी…”, धर्मरावबाबा आत्राम यांचा गौप्यस्फोट, ‘त्या’ भेटीचा खुलासा करत म्हणाले…
will Ajit Pawar come to campaign of Srirang Barne who defeated Parth Pawar
पार्थ पवारांचा पराभव करणाऱ्या श्रीरंग बारणेंच्या प्रचाराला अजित पवार येणार?
Buldhana lok sabha
बुलढाणा : नरेंद्र खेडेकर-हर्षवर्धन सपकाळ यांच्यात दिलजमाई; आधी मैत्रीपूर्ण लढतीचे ट्विट आता फक्त मैत्री

मातब्बरजिंकले

शिवसेनेचे दीपेश म्हात्रे, रमेश म्हात्रे, प्रकाश पेणकर, वैजयंती गुजर घोलप, राजेंद्र देवळेकर, कॉंग्रेसच्या जान्हवी पोटे.