ठाणे : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून ठाणे जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. या गुन्हेगारीमुळे जिल्ह्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत. असा आरोप ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी केला. गुरुवारी ठाण्यात पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी ठाण्याचे खासदार राजन विचारे तसेच ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होत्या.

ठाण्यात गुन्हेगारी वाढत असून ही बाब चिंतेची आहे. सामान्य ठाणेकर यामुळे वेठीस धरला जात आहे. प्रत्येक जिल्ह्यातील वकिल संघटनांसोबत भेट घेते. तेथील गुन्हेगारीचा आलेख समजून घेते. ठाण्यात सुडबुद्धीने कारवाई केली जात आहे. सत्तेचा गैरवापर होत आहे असे अंधारे म्हणाल्या. ठाण्यातील लोकसभेची जागा आम्ही जिंकणारच आहोत. कारण, निष्ठावंत शिवसैनिक कुठेही गेलेले नाहीत. नगरसेवक त्यांची बिले काढण्यासाठी गेले असतील. त्यातील अनेकजण पुन्हा परततील असा दावा देखील त्यांनी केला. शासन आपल्या दारी हा निव्वळ भुरटेपणा आहे. येथे महिलांना घरे मिळालेली नाही, योजना पोहचलेल्या नाहीत, अनेक गांवामध्ये रस्ते, वीज, पाणी नाही, त्यामुळे शासन आपल्या दारी करदात्यांच्या पैशांची लुट असल्याचेही त्या म्हणाल्या.

हेही वाचा >>>जातीय तेढ निर्माण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करा, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार

नरेश म्हस्के हे २४ तास संरक्षणात वावरतात. सतत गुंडांना घेऊन फिरतात. ही गुंडागर्दी त्यांच्यावर असलेल्या वरदहस्तामुळे आहे. हा हात निघाला तर ठाण्यातील रिक्षा चालक देखील त्यांना त्यांची जागा दाखवून देईल असे अंधारे म्हणाल्या. ठाणे हा मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला नाही तर हा आनंद दिघे यांचा बालेकिल्ला असून आम्ही त्यांचे निष्ठावान शिवसैनिक आहोत, त्यामुळे ठाणे लोकसभेच्या निकालाची चिंता आम्हाला नाही. ठाण्यातील लोकसभेची जागा आम्ही जिंकणारच आहोत. कारण, निष्ठावंत शिवसैनिक कुठेही गेलेले नाहीत. नगरसेवक त्यांची बिले काढण्यासाठी गेले असतील. त्यातील अनेकजण पुन्हा परततील असा दावा देखील त्यांनी केला. आमदार रविंद्र वायंकर यांच्यावर दबाव टाकला जात आहे. उद्या ते भाजपमध्ये गेले तर मात्र ‘हिसाब देना पडेगा’ म्हणणाऱ्या किरीट सोमय्या यांना माघार घ्यावी लागणार असल्याची टिकाही त्यांनी यावेळी केली.