शाळा, महाविद्यालय आणि रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ईमेल कोर्टनाका येथील ठाणे पोलीस शाळेच्या ई-मेल आयडीवर आल्याने खळबळ उडाली आहे. संपूर्ण हिंदुस्थानात जिहादचे पालन करण्यासाठी कुर्बानी आणि धमाका हे दोन मार्ग असल्याचे या मेलवरील मजकूरात म्हटले आहे. या घटनेप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाणे पोलिसांच्या सायबर विभागाकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे.

ठाणे पोलीस शाळेत रविवारी राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा होणार होती. त्यामुळे या शाळेतील एक शिक्षिका शनिवारी शाळेची पाहणी करण्यास आली होती. त्यानंतर कामकाज आवरून शाळेच्या ई-मेलवर आयडीवर काही सूचना, संदेश आला का ते पाहण्यासाठी आयडी लॅपटॉपवर उघडला असता त्यावर लष्कर-२९ लष्कर २२ ॲट दि रेट प्रोटोनमेल डॉट कॉम या मेलवरून मिशन २२ असा विषय लिहिलेला एक मेल आल्याचे तिने पाहिले.

Mumbai, Overcrowding ,
मुंबई : रेल्वेगाड्यांमध्ये तुडूंब गर्दी
Royal Enfield Bullet Fire On Road In pune Bullet catches fire due to extreme heat
पुणेकरांनो सावधान! पहिल्यांदा स्फोट, नंतर आग, नवी कोरी बुलेट भररस्त्यात जळून खाक; VIDEO होतोय व्हायरल
Nursing Student s Suicide Prompts Summer Vacation
नागपुरात विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर वसतिगृह रिकामे, महाविद्यालय प्रशासनाने मग…
Nursing student commits suicide in hostel
नागपूर : धक्कादायक! नर्सिंगच्या विद्यार्थिनीची वसतिगृहातच आत्महत्या

हेही वाचा – झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी मोठा पूल आणि मोबाईल टॉवर उडवला; जाताना चिठ्ठीही लिहून गेले, ज्यात लिहिलं होतं,….

तिने हा मेल उघडला असता “मै जावेद खान लष्कर २९ का प्रमुख होने के नाते मेल भेज रहा हूँ …. हमारा एकही मक्सद है पुरे हिंदुस्थान मे जिहाद का पालन हो.. तभी यह देश प्रगती करेगा. इस लिए हमने दो मार्गो का स्वीकार किया है कुर्बानी.. और धमाका….लष्कर २९ मे कई मुजाहिद सदस्य है, जो हर घर मे जिहाद पहुँचाना चाहते है.. लष्कर २९ जिहाद को मानने वाली संघटना है..धमाके के बिना लोगो को समझ नही आती. हिंदुस्थान मे जिहाद पालन करने मे सबसे बडी प्रॉब्लम यहा की एज्युकेशन सिस्टम है.. यहा की एज्युकेशन सिस्टम बंद करके सिर्फ मदरसा द्वारा शिक्षा देनी चाहिए. तभी जिहाद के बारे मे पुरी जानकारी मिलेगी. हम मुंबई के स्कुल और कॉलेज मे धमाके करेंगे”, असा मजकूर या मेलमध्ये होता.

या मेलमध्ये डोंबिवलीतील काही नागरिकांची नावे लिहिली आहेत. शिक्षिकेने या घटनेची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिकेस दिल्यानंतर ठाणेनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा समांतर तपास सायबर विभागाकडून सुरू आहे.