ठाणे : महापालिकेतील शिवसेनेचे माजी नगरसेवक भूषण भोईर यांच्या माजिवडा येथील घरात चोरट्यांनी चोरी करून ४३ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी याप्रकरणी शैलेश रामगुडे याला अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे महापालिकेतील शिवसेनेचे माजी नगरसेवक भूषण भोईर हे माजिवाडा भागातील एका गृहसंकुलामध्ये राहतात. ते ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर यांचे पुत्र तर, स्थायी समिती माजी सभापती संजय भोईर यांचे बंधू आहेत. भूषण यांच्या पत्नी सपना यांना रविवारी परिसरातील एका कार्यक्रमासाठी जायचे होते. त्यासाठी त्यांनी दागिने परिधान करण्याकरिता घरातील कपाट उघडले. पण, तिथे त्यांना दागिने आढळून आले नाही. तसेच रोकडही गायब होती. घरातून एकूण ४३ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामध्ये १६ लाख रुपयांची रोकड, १५ तोळ्यांचा सोन्याचा हार, १२ तोळे वजनाची सोन्याची कंठी, १३ तोळे वजनाचा शाही हार, सहा तोळे वजनाच्या कानातले सोन्याचे दागिने याचा समावेश होता.

हेही वाचा – कल्याण पूर्वेत आमदार गणपत गायकवाड यांच्या भावाच्या केबल कार्यालयाची तोडफोड

हेही वाचा – डोंबिवलीतील वसंत हेरिटेज बेकायदा इमारतीच्या कराची कागदपत्रे सादर करा, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कडोंमपाला आदेश

याप्रकरणी सपना यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे कापुरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलीस तपासादरम्यान, त्यांच्या घरी भूषण यांच्या ओळखीचे शैलेश रामगुडे हे येऊन गेले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीचा ऐवज जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Theft in the house of former shivsena corporator thieves looted the goods worth rs 43 lakh ssb
First published on: 20-02-2024 at 16:56 IST