वसईत पावसाळी फुलांचा बहर; निसर्गप्रेमी, छायाचित्रकारांची गर्दी

श्रावण महिन्यात वसईतील डोंगरदऱ्या, समुद्रकिनारे हिरवेगार दिसू लागले आहेत. त्यासोबतच वसईकरांना विविधरंगी, आकर्षक फुलांचेही दर्शन होत आहे. ठिकठिकाणी फुललेल्या रंगबेरंगी फुलांमुळे वसईचा परिसर आल्हाददायक बनला आहे.

leopard fell into well for water, leopard water washim,
जंगलात पाणी मिळेना, वन्यप्राण्यांचा जीव टांगणीला; तहान भागविण्यासाठी…
pink moon 2024
गुलाबी साडीचा विषय सोडा, आकाशात दिसणार चक्क ‘गुलाबी चंद्र’; आज पौर्णिमेला ‘या’ वेळेत पाहा ‘पिंक मून’
Maharangoli of bharadhana at Godaghat to welcome the new year
नववर्ष स्वागतासाठी गोदाघाटावर भरडधान्याची महारांगोळी, सोमवारी युध्दकलेचे प्रात्यक्षिक
jaljeera powder
उन्हाळ्यात प्या थंडगार जलजीरा! घरीच बनवा ३ महिने टिकेल अशी जलजीरा पावडर, नोट करा रेसिपी

* अनेक प्रकारची काही सुवासिक तर काही गंध नसलेली फुले वसईत पाहायला मिळत आहेत. या फुलांमध्ये तेरडा, अनंत, लिली, सोनटक्का, गंधारी, अग्निशिखा, जय, कुडा, लाल तेरडा, कर्णफुले, घारेणीची फुले यांसारख्या प्रकारच्या फुलांचा समावेश आहे.

* वसईतील ग्रामीण भाग, निर्मळ, भुईगाव, सुरुची बाग, नायगाव, उमेळा, गिरिज, बोळिंज, आगाशी या परिसरात ही फुले मोठय़ा प्रमाणावर आढळून येत आहेत.

* सोनटक्का आणि ब्रह्मकमळ यांना ऐन पावसाळय़ात बहर येतो. ब्रह्मकमळे ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यातच येतात. जेवढी पानाला विस्तारायला जागा, तेवढे पानांचे फुटवे वाढतात. त्यानुसार कळ्या, फुले येण्याची शक्यता वाढते. याला उग्र वास असतो, तरीही तो आल्हाददायक असतो.

* वसईत ही रानफुले फुलल्याने अनेक छायाचित्रकार या फुलांना कॅमेराबद्ध करण्यासाठी येथे येतात.

* फुलांबरोबरच या फुलांवर भिरभिरणारे किटक व फुलपाखरे मन मोहून टाकतात. ही फुले व फुलपाखरे पाहण्यासाठी वसईतील विविध भागांत निसर्गप्रेमींनी गर्दी केली आहे.